आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Can Complaints Against To Sexual Harassment By Email

\'ई-मेल\'द्वारे पाठवा लैंगिक शोषणाविरुद्ध तक्रार; सुप्रीम कोर्टाच्या समितीने घेतला निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लैंगिक शोषणाला सामोऱ्या गेलेल्या महिलांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. पीडित महिलांना आता 'ई-मेल'द्वारेही तक्रारी करता येणार आहेत. सुप्रीम कोर्टाने लैंगिक शोषणाचे प्रकरण हाताळण्यासाठी स्थापन करण्‍यात आलेल्या विशेष सेलने हा निर्णय घेतला आहे.

पीडित महिलेला आपली तक्रार थेट 'ई-मेल'वर पाठवता येणार आहे. याशिवाय रजिस्टर पोस्ट, कुरिअर, स्पीड पोस्ट अथवा प्रत्यक्ष भेटूनही तक्रार करता येणार आहे, असे विशेष सेलच्या सचिव रचना गुप्ता यांनी सांगितले आहे.

लैंगिक शोषण अधिनियम 2013 नुसार पीडित महिला आपल्या तक्रारी 'ई-मेल'द्वारे पाठवू शकतात, असे रचना गुप्ता यांनी सांगितले. यापूर्वी सेलच्या बैठकीत महिलांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची थेट आणि जलद तक्रार दाखल करण्यात येण्याच्या सुविधेवर चर्चा झाली होती. या चर्चेदरम्यान काही नवे बदल सुचविण्यात आले होते. त्यात लैंगिक शोषणाविरुद्धच्या तक्रारी 'ई-मेल'द्वारे पाठवण्याच्या मुद्यावर चर्चा झाली होती. 'ई-मेल'द्वारे तक्रारी पाठविण्‍यावर सेलतर्फे मंजुरी मिळाली आहे. पीडित महिलांनी तक्रार पाठवण्यासाठी रचना गुप्ता यांनी आपला वैयक्तिक ई-मेल आयडी (gupta.rachna@indianjudiciary.gov.in.) दिला आहे.