आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Commission Seek Explaination From DMRC Over Porn Clips Of Metro Railway Cctv

दिल्‍ली मेट्रोतील पॉर्न क्लिप प्रकरणी महिला आयोगाने मागितले स्‍पष्‍टीकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍ली मेट्रोमध्‍ये लावण्‍यात आलेल्‍या सीसीटीव्‍ही कॅमेरातून बनविण्‍यात आलेल्‍या अश्लिल एमएमएस प्रकरणाची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने यासंदर्भात डीएमआरसीकडून दोन आठवड्यामध्‍ये स्‍पष्‍टीकरण मागितले आहे. मेट्रोमधील सीसीटीव्‍ही कॅमे-यातील फुटेज लीक करुन पॉर्न क्लिप बनविण्‍यात आल्‍याचे हे प्रकरण डीएमआरसीने सायबर क्राईम सेलकडे सोपविले आहे. याशिवाय अंतर्गत चौकशीचेही आदेश दिले आहेत.

मेट्रोच्‍या एका अधिका-याने सांगितले की, सीसीटीव्‍ही फुटेजवर सीआयएसएफचे लक्ष राहते. परंतु, सीआयएसएफने याप्रकरणी हात झटकले आहेत. एसआयएसएफच्‍या अधिका-याने सांगितले, की आमचे जवान मेट्रो स्‍थानकाच्‍या सुरक्षेत आहेत. नियंत्रण कक्षाच्‍या आत त्‍यांना तैनात केलेले नाही. त्‍यामुळे व्हिडिओ फुटेजपर्यंत जवान पोहोचू शकत नाहीत. फुटेजचा संपूर्ण डाटा डीएमआरसीकडे असतो. त्‍यांच्‍याच कर्मचा-यांनी फुटेज लीक केले असू शकतात.