आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Gang Raped By Her Husband Along With His Lawyer And Brother In Law

अशि‍लाच्‍या पत्नीवर न्‍यायालयातील चेंबरमध्‍ये वकीलानेच केला बलात्‍कार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- देशाच्‍या राजधानीसोबत नवी दिल्‍ली बलात्‍कारांचीही राजधानी बनली आहे. न्‍यायालयात एका वकीलाच्‍या चेंबरमध्‍येच एका महिलेवर सामुहिक बलात्‍कार झाला. पीडितेचा पती, नणंदेचा नवरा आणि वकीलाने तिच्‍यावर बलात्‍कार केला. यासंदर्भात महिलेने तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्‍यात आलेली नाही.

प्राप्‍त माहितीनुसार, महिलेचा घटस्‍फोटाचा खटला पतियाळा हाऊस कोर्टात सुरु आहे. सोमवारी तिच्‍या पतिच्‍या वकीलाने त्‍याच्‍या चेंबरमध्‍ये बोलावले. त्‍यावेळी इतर तिचा पती आणि नणंदेचा नवरा तसेच पतिचा सचिवही हजर होते. घटस्‍फोटासाठी आपसी सहमती तसेच तडजोडीबाबत चर्चा झाली. परंतु, पीडित महिला समाधानी नव्‍हती. त्‍यामुळे ती चर्चा सोडून निघू लागली. त्‍याचवेळी तिघांनी तिला ओढले आणि बलात्‍कार केला. यात तिचा पतिही सहभागी होता. या घटनेनंतर तिने न्‍यायालयाबाहेर पीसीआर व्‍हॅनमध्‍ये घटना सांगितली.

याप्रकरणी न्‍यायालयाच्‍या परिसरातील सीसीटीव्‍ही कॅमेरांचे फुटेज तपासण्‍यात येत असल्‍याची माहिती पोलिस अधिका-यांनी दिली.