आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला मंत्र्यांच्या िवभागांचे बजेट वाढले! अपवाद स्मृती इराणी यांचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी केंद्रातील सर्वच महिला मंत्र्यांच्या िवभागांचे बजेट वाढवून दिले अाहे. मात्र, याला अपवाद केंद्रीय वस्त्राेद्याेगमंत्री स्मृती इराणी ठरल्या अाहेत.
 
महिला व बाल िवकासमंत्री मेनका गांधी  याच्या िवभागाला मागच्या अर्थसंकल्पात १७,६४० काेटी रुपये देण्यात अाले हाेते. त्यात ४४५४ काेटी रुपयांची भर घालून बुधवारच्या अर्थसंकल्पात २२,०९५ काेटी रुपये घाेषित करण्यात अाले अाहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या मंत्रालयाला मागच्या वर्षी १३,४२६ काेटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात अाला हाेता, त्यात १३७३ काेटींची भर टाकत १४,७९९ काेटी रुपयांची तरतूद करण्यात अाली अाहे. उमा भारती यांच्या नदी िवकास अाणि गंगा संरक्षण मंत्रालयाला २०१६-१७ मध्ये ४७५६ काेटी रुपयांची तरतूद करण्यात अाली हाेती. त्यात २१३१ काेटींची वाढ करून यावर्षी ६८८७ काेटी रुपये घाेषित करण्यात अाले. निर्मला सीतारामण यांच्या वाणिज्य अाणि उद्याेग मंत्रालयाला एकूण १४९६ काेटी रुपये वाढवून देण्यात अाले अाहेत. 

मात्र, वाणिज्य िवभागाला मागच्या वर्षीच्या तुलनेत ९७ काेटी कमी देण्यात अाले, तर त्यांच्याच उद्याेग िवभागात १५९३ काेटी रुपयांची वाढ करण्यात अाली अाहे. गेल्या वर्षी सीतारामण यांच्या दाेन्ही िवभागांसाठी ६५७९ काेटी रुपयांची तरतूद करण्यात अाली हाेती. यावेळी ती ८०७५ काेटी रुपये अाहे.  अकाली दलाच्या मंत्री हरसिमरत काैर यांच्या अन्न प्रक्रिया विभागासाठी ७१ काेटींची वाढ करण्यात अाली अाहे. गेल्या वर्षी त्यांच्या िवभागाची तरतूद ७२९ काेटी हाेती. आता त्यांच्या िवभागाला ८०० काेटी रुपये देण्यात आले आहेत. अरुण जेटली यांनी वस्त्राेद्याेग मंत्री स्मृती इराणी यांना झटका दिल्याचे दिसले अाहे, इराणी यांच्या िवभागासाठी मागच्या वर्षी ६२८६ काेटींची  तरतूद करण्यात अाली हाेती. त्यात ६० काेटी रुपांची कपात करून यंदाच्या अर्थसंकल्पात ६२२६ काेटींची तरतूद करण्यात अाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...