नवी दिल्ली - अत्याचारापासून बचावात हातून खून झाला तरी महिलांनी घाबरू पाहू नये. या धोक्यामुळे स्वसंरक्षण अधिकाराखाली त्यांना समोरच्याला ठार करता येते, असे दिल्लीचे पोलिस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी म्हटले आहे. स्वसंरक्षण प्रशिक्षणानंतर ते म्हणाले, दंडसंहिता यावर स्पष्ट आहे. कोणी अत्याचार करण्याची भीती असेल तर ती हा अधिकार वापरू शकते. स्वत:चा बचाव करताना हातून खून झाला तरी तिला गुन्हेगार मानले जाणार नाही. परंतु भीती तर्कसंगत असावी.
जिवालाधोका, तरच अधिकार : निकम
प्रसिद्धवकील उज्ज्वल निकम यांनी मात्र बस्सी यांचे विधान चुकीचे ठरवले आहे. ते म्हणतात...
>खून प्रकरणात कायद्याने पुरुष महिलांसाठी वेगवेगळी व्यवस्था नाही. राइट टू सेल्फ डिफेन्ससमोर दोघेही समान आहेत.
>एखाद्याने हल्लेखोराचा खून केला तरी कलम ३०२नुसार गुन्हा दाखल होईल. नंतर हे स्वसंरक्षणार्थ घडले हे त्याला सिद्ध करावे लागेल.
>हा अधिकार केवळ जिवाला धोका असल्यासच आहे. छेडछाड, विनयभंगाच्या स्थितीत नाही.