आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोली मार भेजेमें... महिलांसाठी खास \'निर्भिग\' रिव्हॉल्व्हर लॉंच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर- इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीने (आयओएफ) विशेष करून महिलांसाठी तयार केलेल्या .32 बोअर लाईटवेट रिव्हॉल्व्हर 'निर्भिक'चे आज (मंगळवार) लॉंचिंग करण्यात आले.
'निर्भिक' रिव्हॉल्व्हर विकत घेण्याची इच्छा व्यक्त केलेल्या हजारो महिलांमधून तिघींची निवड करण्यात आली आहे. यात लखनौच्या गीता यादव, बाराबांकीच्या कल्पना पांडे आणि सीमा खारबांडा यांचा समावेश आहे. तिघींपैकी गीता यादव वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची पत्नी आहे, सीमा यांना राजकीय पार्श्वभूमी आहे तर कल्पना गृहिणी आहेत.
दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर महिलांना आत्मसंरक्षणासाठी विशेष रिव्हॉल्व्हर देण्याची कल्पना पुढे आली. त्यातून 'निर्भिक'चे डिझायनिंग आणि निर्मिती करण्यात आली आहे. या रिव्हॉल्व्हरचे वजन 500 ग्रॅम असून ती पर्समध्ये सहज ठेऊन नेता येऊ शकते.
या रिव्हॉल्व्हरची छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर