आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Women Taxpayers May Get An Extra Discount 2014 15, Bullet Trains May Become Reality

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BUDGET : इनकम टॅक्समध्ये महिलांना सूट, बुलेट ट्रेनची भेट मिळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - सरकारने 8 जुलै रोजी रेल्वे अर्थसंकल्प आणि 10 जुलैला केंद्रिय अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी कठोर निर्णय घेण्याबाबत वक्तल्य केले असले तरी, सामान्य नागरिकांना अनेक प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2014-15 च्या केंद्रिय अर्थसंकल्पामध्ये नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळू शकतो. मोदी सरकार महिलांच्या इनकम टॅक्‍स स्लॅबमध्ये वाढ करण्याच्या विचारात आहे. त्यानुसार आधीप्रमाणेच महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक सूट मिळण्याची व्यवस्था पुन्हा लागू होऊ शकते. 2012-13 च्या बजेटमध्ये महिला आणि पुरुष दोघांसाठीही ही सूट वार्षिक दोन लाखांच्या उत्पन्नापर्यंत करण्यात आली होती.

महिला व ज्येष्ठांना विशेष सूट
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार देशाच्या करप्रणालीमध्ये बदल करण्याच्या योजना आखत आहे. त्यानुसार सरकार पुरुषांसाठीची मर्यादा तीन लाखावर नेऊ शकते, तर नोकरदार महिलांची मर्यादा वाढवून 3.25 ते 3.50 लाख रुपये केली जाण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर सरकार ज्येष्ठांसाठी इनकम टॅक्‍समधून सूट मिळण्याची वयोमर्यादा 65 वरुन 60 वर आणण्याच्याही विचारात आहे. तसेच सरकार डायरेक्ट टैक्स कोड बिल-2013 च्या काही प्रस्तावांवरही विचार करत आहे.

करदात्यांना मोठा दिलासा
पुढील महिन्यात सादर होणा-या अर्थसंकल्पामध्ये सरकार कर वाचवण्यासाठी अधिक मार्ग खुले करण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते सरकार इनकम टॅक्सच्या सेक्शन 80 सी ची मर्यादा एक लाखावरून 1.5 लाख रुपये करू शकते. तसेच यात इन्फ्रा बॉन्ड आणि आरोग्य विम्याचा समावेश केला जाऊ शकतो. सुत्रांच्या मते 80सी मध्ये इन्फ्रा बॉन्डचा समावेश केला जाऊ शकतो. तसेच इन्फ्रा बॉन्डमधील गुंतवणुकीचे प्रमाण 20,000 हून वाढवून 30,000 रुपये केले जाऊ शकते. आरोग्य विम्यातील सूट 15,000 रुपयांवरून वाढवली जाऊ शकते.

बुलेट ट्रेनची भेट मिळण्याची शक्यता
रेल्वेविभाग खासकरून दोन प्रस्तावावर काम करत आहे. काही खास मार्गांवर ताशी 300 किमी पेक्षा अधिक वेगाच्या रेल्वे सुरू करण्याचा विचार आहे. तसेच सध्याच्या सर्व ट्रॅकवरही ताशी 130 ते 150 क‍िमी वेगाने रेल्वे धावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिका-याच्या मते, रेल्वे मंत्री सदानंद गौडा मोदींचे स्वप्न साकारणा-या अशा प्रस्तावांवर विशेष लक्ष केंद्रित करत आहेत. देशात हाय स्‍पीड ट्रेन नेटवर्क सुरू करण्याबरोबरच प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्या अशी मोदींची इच्छा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुलेट ट्रेनसाठी मुंबई ते पुणे आणि अहमदाबाद ते मुंबई या दोन मार्गांचा सर्वात आधी प्रस्ताव दिला जाणार आहे. सरकारने नुकतेच हाय स्‍पीड ट्रेन सेगमेंटमध्ये 100 टक्के एफडीआयला मंजुरी देण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे या चर्चांना बळ मिळाले आहे.