आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women To Be Inducted As Officers In SSB For First Time News In Divya Marathi

एसएसबी यंदा 136 अधिकारी नेमणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाच दशकांपूर्वी स्थापन झालेल्या सशस्त्र सीमा दलात (एसएसबी) यंदा 136 नवीन अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे. दलातील पुरुषांचे वर्चस्व मोडीत काढत सरकारने पहिल्यांदाच महिला अधिकार्‍यांच्या भरतीला परवानगी दिली आहे.

महिलांची कॉम्बेट ऑफिसर पदावर नियुक्ती केली जाणार असून त्यांना नियुक्तीनंतर दूरवरील सीमावर्ती भागात संरक्षणासाठी पाठवले जाईल. यात नेपाळ आणि भूतानसह अन्य काही महत्त्वाच्या सीमा भागांचाही समावेश आहे. आतापर्यंत महिलांना केंद्रीय राखीव पोलिस दल, केंद्रीय औद्योगिक संरक्षण दल आणि सीमा सुरक्षा दलातील ऑफिसर कॅडरचेच कॉम्बेट पद मिळत होते. तथापि, अद्यापही महिलांना चीनच्या सीमेवर तैनात इंडो-तिबेट सीमा पोलिस दलात नियुक्त केले जात नाही.

गृहमंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 25 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या महिलांची थेट सहायक कमांडंट पदावर नियुक्ती केली जाईल. 2015 च्या शेवटपर्यंत या दलाची पहिली प्रशिक्षित तुकडी बाहेर पडेल.

बीएसएफमध्ये मागच्या वर्षी महिला अधिकार्‍याच्या नियुक्तीस परवानगी देण्यात आली होती. संरक्षण दलाकडे 1 हजार 751 किलोमीटर लांबीची इंडो-नेपाळ सीमा आणि 699 किलोमीटर लांबीची इंडो-भूतान सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे.

2007 मध्ये झाली होती पहिली भरती
एसएसबीत 2007 मध्ये पहिल्यांदाच कॉन्स्टेबल र्शेणीवर महिलांची भरती करण्यात आली होती. महिलांच्या या तुकडीचे नेतृत्व पुरुष अधिकार्‍यांकडेच होते. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 1400 महिलांच्या या निमलष्करी दलात महिला अधिकार्‍यांची गरज भासत होती. नवीन महिला अधिकार्‍यांची नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दल परीक्षेद्वारे केली जाईल.