आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women's Security At Delhi, Auto Rickshaw And Bus In Alarm For Rape Case

महिला सुरक्षा: रिक्षा, बसमध्ये मुलीची छेड काढताच वाजेल अलार्म

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशात 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक करणार्‍या वाहनांना जीपीएस (ग्राउंड पोझिशनिंग सिस्टीम) बसवण्यासाठी वाहतूक मंत्रालयाने 20 फेब्रुवारी ही अंतिम मुदत देऊ केली आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी संबंधित वाहनमालक किंवा संस्थांनी केली नाही तर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

यापूर्वी वाहतूक मंत्रालयाने अशा वाहनांमध्ये जीपीएस बसवण्यासाठी 30 सप्टेंबर 2013 ही अंतिम मुदत दिली होती. सध्या 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी राबवण्यात येणारा हा प्रकल्प दोन वर्षांत देशपातळीवर सर्वत्र लागू केला जाणार आहे.

काय आहे यंत्रणा?
0 महिला सुरक्षेसाठी पुरवण्यात येणार्‍या निर्भया निधीतून या यंत्रणेच्या कार्यचलनासाठी गुंतवणूक करण्यात येईल.
0 सार्वजनिक वाहतूक करणार्‍या वाहनांमध्ये जीपीएस बसवल्यानंतर यावर देखरेख करण्यासाठी आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीने 1 हजार 405 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यात संशयास्पद हालचालिची माहिती अधिकार्‍यांना देण्यासाठी अलार्मची सुविधा देण्यात येणार आहे.
0 मोठय़ा शहरांमध्ये जागोजाग सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून जीपीएसमार्फत महिला व मुलींच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल.

निर्भया प्रकरणानंतर आखले धोरण
16 डिसेंबर 2012 रोजी राजधानी दिल्लीत एका 23 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक अत्याचार झाला होता. या अमानुष प्रकारानंतर पीडित तरुणीचा सिंगापूरमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला. देशभर खळबळ माजवणार्‍या या प्रकारामुळे महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने केंद्र सरकारने महिला सुरक्षेसाठी नवे धोरण आखले.

या वाहनांत असेल जीपीएस
0शहरांतील ऑटोरिक्षा, सिटीबस, खासगी वाहतूक करणार्‍या बस व इतर वाहनांत जीपीएस बसवणे बंधनकारक.
0महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये सार्वजनिक वाहतूक करणार्‍या वाहनांमध्ये जीपीएस बंधनकारक.
0औरंगाबाद शहरात 35 सिटीबस, सुमारे 25 हजार ऑटोरिक्षा आणि सुमारे 3 हजार काळीपिवळी जीपमध्ये बसेल जीपीएस.