आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगार नियुक्ती, कपात कंपन्यांना सोयीची होणार? कायद्यात बदल करण्याची केंद्राची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कामगार कायद्यात बदल करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली असून या प्रस्तावित बदलांमुळे देशात नव्या नाेकऱ्या आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा माेदी सरकारला विश्वास अाहे. अपेक्षित प्रस्तावित बदल मंजूर झाले तर कामगारांची नियुक्ती व कपात करणे कंपन्यांना अधिक सोपे जाणार आहे.

कायद्यांतील प्रस्तावित बदलांचे संकेत देताना कामगार मंत्रालयाचे सचिव शंकर यांनी सांगितले की, नव्या नोकऱ्या निर्माण करण्यासाठी, विविध क्षेत्रांतील कंपन्यांना नोकऱ्यांच्या नियुक्तीशी व कपातीशी संबंधित तरतुदींत शिथिलता हवी आहे. याच भूमिकेला अनुसरून औद्योगिक संबंध आणि आणि मजुरीशी संबंधित दोन प्रमुख विधेयके लवकरच मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहेत. कॅबिनेटची मंजुरी मिळताच नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ही विधेयके संसदेत मांडली जातील. सध्या ४४ कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून ४ नवे लेबर कोड तयार करण्याचे काम सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...