आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Highest Railway Bridge Construction In Jammu And Kashmir

येथे तयार होत आहे जगातील सर्वात उंच पूल, हेलिकॉप्टरने येतात ट्रक - जेसीबी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान 20 डिसेंबर रोजी होणार आहे. आधीच्या चार टप्प्यांमध्ये विक्रमी मतदान झाले आहे. त्याचा फायदा कोणाला मिळतो हे लवकरच कळेल. सर्वच राजकीय पक्षांनी विकासाचा दावा करत मते मागितली आहेत. या दरम्यान दहशतवादी घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना दहशतवादी घटनांमुळे पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. मात्र, अनेक संकटांवर मात करुन काही योजना पूर्णत्वास गेल्या आहेत. काही योजनांवर काम सुरु आहे. जम्मू-काश्मीरमधील विकास योजना या मालिकेत आज आम्ही तुम्हाला चिनाब नदीवरील पुलाची माहिती देत आहोत.
जगातील सर्वात उंचीवरील रेल्वेपूल ठरणार
चिनाब नदीवर तयार होत असलेला पूल हा अभियांत्रिकीची कमाल मानली जात आहे. हे अत्यंत क्लिष्ट काम आहे. येथे वाहाने पोहोचण्यास अडचणी आहेत, तरीही 2016 पर्यंत हा पूल तयार होईल अशी आशा आहे. पूल तयार झाल्यानंतर जगातील सर्वात उंचीवरील रेल्वेपूल म्हणून त्यांची ख्याती होणार आहे. या पूलाच्या बांधकामासाठी भारतीय लष्कराचीही मदत घेतली जात आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून ट्रक, जेसीबी आणि खोदकाम करण्यासाठीही इतर मशीनरीज आणि साधने आणली जात आहेत.
बारामुल्ला आणि श्रीनगरला जोडणार
रासी जिल्ह्यातून वाहाणार्‍या चिनाब नदीवर हा पूल बांधला जात आहे. यामुळे बारामुल्ला आणि श्रीनगर हे दोन जिल्हे जोडले जाणार आहेत. चीनाब नदीच्या तळापासून या पूलाची उंची 359 मीटर राहाणार आहे. एकावर एक पाच कुतुबमिनार उभे केले तेव्हा या पुलाच्या उंचीची बरोबरी करु शकतील. यावरुन आंदाज लावता येईल की, या पुलाची उंची किती असमार आहे.
धनुष्याच्या आकारातील पूल
चीनाब पूलावरुन जम्मू-उधमपूर-कटरा-क्वाजिकूंड हे अंतर सात तासात पार करता येणार आहे. या पुल धनुष्याच्या आकाराचा असेल. त्याची लांबी 1315 मीटर असणार आहे. या पूलाचे पिलर विशिष्ट तंत्रज्ञानाने तयार केले जात आहेत, ज्यामुळे नैसर्गीक आपत्ती आणि काश्मीरमधील वेगवान हवेचा त्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
ताशी 100 किलोमीटर वेगाने धावणार रेल्वे
अभियंत्यांनी या पूलाचे आयुष्य 120 वर्षे असेल असा दावा केला आहे. यावरून ताशी 100 किलोमीटर वेगाने रेल्वे धावू शकणार आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसे सुरु आहे जगातील सर्वात उंच पुलाचे काम