आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेल किंवा अभिनेत्री नाही... तरीही होत आहे विदेशात चर्चा, वाचून तुम्हाला ही बसले धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिशेषने बंगळुरु विद्यापीठातून फॅशन आणि ड्रेस डिझायनिंगचा कोर्स केला. - Divya Marathi
बिशेषने बंगळुरु विद्यापीठातून फॅशन आणि ड्रेस डिझायनिंगचा कोर्स केला.
नवी दिल्ली - फोटो पाहून कोणालाही वाटेल की ही एखादी मॉडेल आहे. मात्र किन्नरही एवढे सुंदर दिसू शकतात हे बिशेष हुईरमने दाखवून दिले आहे. एवढेच नाही तर केवळ नाच गाणे करुन आणि सिग्नलवर उभे राहून दुआ देऊनच किन्नरला पोट भरता येते, हे देखिल या किन्नरने खोटे ठरविले आहे. 
 
कोण आहे बिशेष 
- मणिपूरचा रहिवासी बिशेष हुईरम हा 27 वर्षांचा किन्नर आहे. दिसायला कोणत्याही मॉडेलपेक्षा तसूभरही कमी नाही. 
- बिशेषने थायलंडमध्ये झालेल्या मिस इंटरनॅशनल क्विन ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊन मणिपूरचे नाव मोठे केले आहे. 
- मणिपूरी चित्रपटांमध्येही बिशेषने काम केले आहे. 
 
फॅशन आणि ड्रेस डिझायनिंगचा कोर्स केला
- बिशेष हुईरमने बंगळुरु विद्यापीठातून फॅशन आणि ड्रेस डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला आहे. 
- किन्नर असूनही बिशेष येथील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. 
- बिशेषच्या आई-वडिलांना जेव्हा कळाले की आपला मुलगा किन्नर आहे तेव्हा त्यांनी त्याला साथ दिली. त्याचे वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आहे. 
 
लहानपणापासून मुलींच्या कपड्यांची हौस 
- बिशेषची आई कोमदोन्बी यांनी सांगितले, की लहानपणापासून त्याला मुलींचे कपडे घालण्याची हौस होती. त्यांच्यासारखाच मेकअप करायला त्याला आवडायचे. हे पाहून त्याचे वडील आणि मी खूप नाराज व्हायचे. मात्र हळुहळु सत्य आमच्या लक्षात आले. 
- बिशेषला पासपोर्ट मिळण्यात पहिल्या खूप अडचणी आल्या. त्याला पासपोर्ट व व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे त्याला बाहेर देशात होणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेता आला नाही. 
- एक प्रसिद्ध किन्नर असतानाही त्याला काही नाहक वादांचा सामना करावा लागला, त्यावेळी त्याला किन्नर समुदायाचा मोठा पाठिंबा मिळाला होता. 
 
सौंदर्य स्पर्धेत भाग घेतलेल्या किन्नरचे फोटो पुढील स्लाइडवर..
बातम्या आणखी आहेत...