आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आप सरकारचे घटनेचे वाचन चुकीचे : जंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली: दिल्लीतील आप सरकारचे राज्यघटनेचे वाचन चुकीचे असावे. त्यातूनच त्यांचा केंद्र सरकारशी संघर्ष उदभवतो, असा टोला नायब राज्यपाल नजीब जंग यांनी लगावला आहे.
राज्य सरकारने घटनेचे वाचन करताना काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा संविधानाबद्दलचे आकलन चुकीचे होते. या प्रक्रियेत माझा हस्तक्षेप काहीही नाही. न्यायालयापेक्षा त्यांचे संविधानाबद्दलचे आकलन चुकीचे आहे. त्यातूनच संघर्षाला तोंड फुटते. केंद्र सरकारने कायदा आणि सुव्यवस्था, पोलिस, जमिन, सेवा इत्यादी क्षेत्रात आपली एक भूमिका मांडली आहे. त्याला विरोध करून दिल्ली सरकारने अनेकदा चुकीचे निर्णय घेतले. त्याचा परिणाम संघर्षात झाला आहे.
कोणत्याही लोकनियुक्त सरकारच्या सल्ल्यास आपण बांधील नसल्याचे जंग यांनी स्पष्ट केले. दिल्ली सरकारने कोणताही निर्णय घेतला तरी त्याचे परीक्षण केंद्र सरकार करते. सरकारच्या विस्तृत धोरणाशी त्यात विसंगती आढळून आल्यास सरकार त्याला आक्षेप घेते. दिल्ली सरकारच्या निर्णयाशी माझी बांधिलकी नाही.
‘अस्थैर्य दर्शवणारा निर्णय’
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘आप’ने जाहीर केलेल्या अनेक उमेदवारांची नावे नंतर रद्द केली आहेत. त्यावरून पक्षाची मानसिक पातळीवरील अस्थिरता स्पष्टपणे जाणवणारी आहे, असा आरोप काँग्रेसच्या प्रदेश समितीचे नेते रणजित भाटी व अजित इंदर मोफर यांनी केला आहे. खरे तर तिकीट वाटप हा अंतर्गत मामला आहे. परंतु काही उमेदवारांची नावे काही तासांत मागे घेण्यात आली आहेत. त्यामुळे पक्षातील अस्थैर्य समोर आले आहे, असा आरोप भाटी यांनी केला आहे.
२/३ बहुमताची खात्री : अमरिंदर
पंजाबमधील आगामी विधानसभेत काँग्रेसला दोन तृतीयांश बहुमत मिळेल, असा विश्वास प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केला आहे. पुढील वर्षी राज्यात काँग्रेस सरकार स्थापन करेल, असा दावाही त्यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...