आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिब्रहान यांचा दावा- \'हिंदू दहशतवाद\' शब्दाचा सर्वप्रथम वापर बाबरी रिपोर्टमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासोबत जस्टिस लिब्रहान. - Divya Marathi
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासोबत जस्टिस लिब्रहान.
नवी दिल्ली - 'हिंदू दहशतवाद' शब्दावरुन गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यूपीए सरकारवर निशाणा साधला होता. हिंदू दहशतवाद हा शब्द त्यांनीच वापरण्यास सुरुवात केली, यामुळे दहशतवादाविरोधातील लढाईची धार कमी होते, असेही गृहमंत्री म्हणाले होते. या शब्दावरुन वाद सुरु असताना बाबरी मशिद पाडल्यानंतर नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाचे अध्यक्ष जस्टिस मनमोहनसिंग लिब्रहान यांनी त्यांच्या अहवालात हिंदू दहशतवाद या शब्दाचा प्रथमच वापर केल्याचा खुलासा स्वतः लिब्रहान यांनी केला आहे. लिब्रहान यांनी एका मुलाखतीत म्हटले, की मी माझ्या अहवालावर आणि त्यात वापरण्यात आलेल्या शब्दांवर आजही कायम आहे. ते म्हणाले, की बाबरी मशिद पाडण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांची होती आणि बाबरी पाडण्याचे हिरो तेच होते.
काय म्हणाले जस्टिस लिब्रहान
एका मुलाखतीत निवृत्त न्यायमूर्ती लिब्रहान म्हणाले, हिंदू दहशतवादी शब्दाचा सर्वप्रथम वापर मीच केला होता. आज मी माझे विचार बदलले तरी अहवालातील शब्द आता कोणीही मिटवू शकणार नाही. त्याबरोबरच दहशतवाद कोणताही असो तो वाईटच. कारण त्यात निरपराध लोक मारले जातात, असेही ते म्हणाले. लिब्रहान यांना विचारण्यात आले, की तुमच्या अहवालात भाजप नेत्यांना प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अशा नेत्यांची घटनात्मक पदी नियुक्ती करणे योग्य आहे का ? यावर ते म्हणाले, बाबरी पाडण्यात कल्याण सिंह (सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत) यांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. तेच त्या कारवाईचे हिरो होते. सर्व राजकीय पक्षांनाही त्याची माहिती आहे. आम्ही तयार केलेल्या अहवालात सर्व सत्य मांडण्यात आले आहे आणि मी आजही त्यावर ठाम असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर त्यात वापरण्यात आलेल्या शब्दांवरही कायम असल्याचे त्यांनी सांगितले.