आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांत 20 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार चीन, भारताबरोबर केले 12 करार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : हैदराबाद हाऊसमध्ये शिखर बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मोदी आणि जिनपिंग

नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात गुरुवारी झालेल्या शिखर बैठकीत दोन्ही देशांदरम्यान 12 करारांवर सह्या करण्यात आल्या. त्यानुसार आगामी पाच वर्षांत चीन भारतात 20 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

दोन्ही देशांत झालेले 12 करार

1. कैलास मानसरोवर यात्रेसाठी सिक्कीमच्या नाथू ला पासजवळून नवा मार्ग देण्यास चीनने तयारी दाखवली आहे. आतापर्यंत उत्तराखंडच्या लिपूलेख पासजवळून लोक कैलास मानसरोवर यात्रेसाठी जात होते. प्रवासासाठी नाथू ला पासचा वापर केल्यास चीनने तयार केलेल्या रस्त्यावरून प्रवास करता येईल. त्यामुळे वेळेची बचत होईल.

2. भारतीय रेल्वेचा वेग वाढवणे, हायस्पीड ट्रेनबाबत शक्यतांचा अंदाज घेणे, भारतीय रेल्वे कर्मचा-यांचे प्रशिक्षण, रेल्वे स्थानकांचा नव्याने विकास आणि रेल्वे विद्यापीठ अशा क्षेत्रांत सहकार्य करण्यास चीनने सहमती दर्शवली आहे.

3. चीन विशेष रेल्वे योजनांमध्ये सहकार्य करण्यासही तयार आहे.

4. भारत आणि चीनदरम्यान व्यापार क्षेत्रात सहकार्याचा करार.

5. चीनच्या बाजारात कृषी, औषधी अशा भारतीय उत्पादनांना अधिक संधी दिली जाईल.
6. दृकश्राव्य सहनिर्मिती (Audio Visual Co production) करार. दोन्ही देशांतील सुविधांचा करून एकत्रितपणे चित्रपटांची निर्मिती करणार.

7. तस्करी सारख्या सीमेवर होणारे आर्थिक अपराध कमी करण्यासाठी माहितीचे आदान प्रदान तयार करण्याबाबत करार.

8. अंतराळ मोहिमांमध्ये सहकार्याबाबतचा करार. संशोधन व विकासासाठी सहकार्य करणार.
9. सांस्कृतिक आदान-प्रदान करण्याबाबत करार. त्याअंतर्गत संग्रहालये, पुरातत्त्व संस्था आणि कला क्षेत्रात सहकार्य.
10. 2016 च्या नवी दिल्ली पुस्तक मेळाव्यात सहभागी होणार चीन.

11. औषध क्षेत्रात करार. त्याअंतर्गत ड्रग स्टँडर्ड, पारंपरिक औषधे आणि ड्रग टेस्टींग सारख्या क्षेत्रांत दोन्ही देश एकत्रिपणे काम करणार.
12. मुंबई आणि शांघाय दरम्यान सिस्टर सिटीचे नाते तयार करणार. शांघायच्या धर्तीवर मुंबईच्या विकासावर जोर देणार.
या करारांनंतर माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, चीनबरोबरचे क्षमतेच्या तुलनेत भारताचा व्यापार अत्यंत कमी आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांना चीनमधील बाजारपेठेत संधी द्यावी अशी चीनला विनंती केल्याचेही ते म्हणाले. या मुद्यावर विचार करणार असल्याचे जिनपिंग म्हणाले. दरम्यान, नागरी अणु सहकार्याच्या मुद्यावर चर्चा करण्यास दोन्ही देश तयार झाल्याचेही ते म्हणाले.
पुढील स्लाइडवर वाचा, बुधवारी गुजरातमध्ये झालेल्या तीन करारांबाबत