आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yakub Execution Certain, Tight Security Across State

#YakubHanged: पहाटे लटकवले फासावर, बॉम्बस्फोट पीडितांना न्याय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- याकूब मेमनचा मृतदेह नागपूर तुरुंगात विमानतळावर नेताना अॅम्ब्युलंस.)
मुंबई/नागपूर - मुंबई बॉम्बस्फोट पीडितांना अखेर आज (गुरुवार) न्याय मिळाला. बॉम्बस्फोट प्रकरणातील गुन्हेगार याकूब मेमनला आज सकाळी (6.30) वाजता नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली. डॉक्टरांनी त्याच्या पार्थिवाचे पोस्ट मॉर्टम कारागृहातच केले. अंडरटेकिंगनंतर याकूबचे शव कुटुंबियांकडे सुपुर्द केले जाणार आहे. शव ताब्यात घेण्यासाठी याकूबचे दोन भाऊ - सुलेमान आणि उस्मान नागपूर कारागृहात गेले. याकूबच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार केले जातील. नागपूर विमानतळावरुन इंडिगो फ्लाइडने कुटुंबिय याकुबचा मृतदेह घेऊन रवाना झाले.
प्रथमच मध्यरात्रीनंतर सुरु झाले सुप्रीम कोर्ट
देशाच्या इतिहासात प्रथमच मध्यरात्रीनंतर सुप्रीम कोर्ट उघडण्यात आले. याकूबच्या फाशीवर स्थगिती देण्यायी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. जस्टिस दीपक मिश्रांच्या नेतृत्वातील न्यायपीठाने याचिका रद्द केली. मिश्रा म्हणाले, याकूबला बचावाचा पूरेसा अवधी दिला गेला होता. गुरुवारी पहाटे याचिका रद्द होताच पहाटे पाच वाजता फाशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याआधी बुधवारी रात्री नागपूर पोलिसांनी याकूबच्या कुटुंबियांना कॉन्फीडेंशिअल पत्र ते थांबलेल्या हॉटेलमध्ये जाऊन देण्यात आले.
(ताजी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा)
केव्हा काय झाले

10:25AM: मेमनच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली. प्रतिबंधात्मक कारवाई करत 300 जणांना ताब्यात घेण्यात आले.
...........................
10:13AM: याकूबची शेवटची इच्छा पूर्ण केली होती. फाशीआधी तुरुंग प्रशासनाने मुलीसोबत बोलणे करुन दिले होते.
...........................
10:05AM: महाराष्ट्राचे अतिरिक्त गृह सचिव म्हणाले, मुंबईत सुरक्षा व्यवस्था वाढवली. अतिरिक्त बल तैनात.
...........................
09:53AM: याकूबचे कुटुंबिय त्याचा मृतदेह मुंबईला घेऊन येत आहे. कुटुंबातील सात सदस्यांमध्ये दोन महिला आहेत.
...........................
09:48AM: नागपूर एअरपोर्टवर याकूबचा मृतदेह आणला.
...........................
09:42AM: याकूब मेमनचा मृतदेह तुरुंगातून बाहेर काढण्यात आला. त्याचे कुटुंबिय मृतदेह घेऊन विमानतळाकडे निघाले. इंडिगो फ्लाइटने मृतदेह मुंबईला आणण्यात येणार.
...........................
09:40AM: भाजप प्रवक्ते एम.जे. अकबर यांनी थरुरच्या ट्विटवर लिहिले - मला दुःख होते की काही लोक असा विचार करतात. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करु शकत नाही. निर्णय सर्वांसाठी आणि सर्वांच्या हक्कांसाठी आहे. मला नाही वाटत यात काही घाई झाली आहे. 22 वर्षांनी निर्णय आला आहे, त्यामुळे त्यात घाई झाली असे म्हणता येत नाही.
...........................
08:42AM: महाराष्ट्राचे अतिरिक्त गृह सचिव के.पी. बख्शी म्हणाले - कुटुंबियांनी मृतदेहाची मागणी केली होती. कारागृह अधीक्षकांनी त्यानंतर निर्णय घेतला आणि याकूबचे शव त्याच्या कुटुंबियांना दिले जाईल. संपूर्ण राज्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखली जाईल. लोकांनीही शांतता ठेवावी.
...........................
08.30AM: नागपूर विमानतळावर एअर अँम्बुलन्स तयार ठेवण्यात आली आहे.
...........................
07:30AM: याकूबचे माजी वकील श्याम केशवानी म्हणाले, की आपल्या देशात वाईट मानसिकता ठेवणाऱ्यांचा विजय झाला आहे.
...........................
07:28AM: याकूबला फाशी दिल्यानंतर पाच निमिटांचे मौन ठेवण्यात आले.
...........................
07:22AM: 6.30 वाजता दिली फाशी. सात वाजून दहा मिनिटांनी केली घोषणा.
...........................
07:18AM: याकूबचा मृतदेह विमानाने नागपूर येथून मुंबईला नेण्यात येणार आहे.
...........................
07:16AM: याकूबचे भाऊ सुलेमान आणि उस्मान तुरुंग अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.
...........................
07:15AM: 8.15 वाजता तुरुंग प्रशासन निर्णय घेणार, की याकूबचे पार्थिव कुटुंबाला द्यायचे की नाही.
...........................
07:10AM: कुटुंबाला पार्थिव सोपविण्यापूर्वी एक अंडरटेकिंग घेतले जाणार आहे. पार्थिव घेऊन जनाजा काढू नका, त्याची पब्लिसिटी
करु नका, अशा स्वरुपाचे हे अंडरटेकिंग राहणार आहे.
...........................
07:05AM: पोस्ट मॉर्टम झाल्यावर टाडा न्यायालयात डेथ सर्टिफिकेट सादर केले जाईल. त्यानंतर केस कायम स्वरुपी बंद होईल.
...........................
07:01AM: याकूबला फाशीच्या फंद्यातून खाली उतरवण्यात आले. तो मृत झाल्याचे उपस्थित डॉक्टरने सांगितले.
...........................
06:55AM: याकूबला फाशी झाली तेव्हा फाशी यार्डमध्ये सहा लोक उपस्थित होते. डीआयजी आणि दो कॉन्स्टेबल उपस्थित होते.
...........................
06:54AM: भाजप प्रवक्ते नलिन कोहली म्हणाले, की भारतीय न्याय व्यवस्थेची ही वैशिष्ट्ये आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पूर्णपणे योग्य होती. याकूबला अनेक संधी मिळाल्या. त्यानंतर फाशी देण्यात आली.
...........................
06:45AM: सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घोषणा करणार.
...........................
06:40AM: याकूबच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टम केले जाणार. चार डॉक्टर सुमारे तासाभरात करणार पोस्ट मॉर्टम.
...........................
06:35AM: नागपूरच्या तुरुंगात याकूब मेमनला फाशी देण्यात आली.
...........................
06:15AM: याकूबला फाशीच्या स्थळापर्यंत नेण्यात आले.
...........................
05:37 AM: याकूबने नमाज अदा केली.
...........................
05:15 AM: याकूबचे वकील आनंद ग्रोवर म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल चुकीचा आहे. मला दुःख झाले आहे.
...........................
05:10 AM: याकूबला नवीन कपडे देण्यात आले.
..................
05:05 AM: नागपूर तुरुंगात फाशी देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

पुढे वाचा, डेथ वॉरंट कायदेशीर प्रक्रियेनुसारच......