आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yakub Memon Files Fresh Mercy Plea With President A Day Before His Hanging

क्यूरेटिव पिटीशन फेटाळले; याकूबने पुन्‍हा केला राष्‍ट्रपतीकडे दयेचा अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली / नागपूर – मुंबई बॉम्‍बस्‍फोटातील सिद्धदोष आरोपी याकूब मेमन याने आज (बुधवारी) राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्‍याकडे पुन्‍हा एक दयेचा अर्ज केला. यापूर्वी त्‍याच्‍या भावाने वर्ष 2014 मध्‍ये दयेचा अर्ज केला होता. तो राष्‍ट्रपतींनी फेटाळला. दरम्‍यान, आज (बुधवारी) न्‍यायाधीश दीपक मिश्रा, प्रफुल्ल पंत आणि अमिताभ रॉय यांचे न्‍यायपीठ सर्वोच्‍च न्‍यायालयात त्‍याच्‍या फाशीवर सुनावणी करत आहेत.
यापूर्वी याकूबने सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. त्‍यासाठी नवे न्यायपीठ स्थापले गेले असून, आज (बुधवारी) सुनावणी करत आहेत. टाडा न्यायालयाने डेथ वॉरंट जारी केले होते. त्यानुसार, याकूबला ३० जुलै रोजी फाशी देण्‍याची तयार गृहविभागाने केली आहे. सर्व पर्याय संपले नाहीत, असे म्हणून याकूबने डेथ वॉरंटला आव्हान दिले आहे.
राज्‍यापालाकडेही अर्ज प्रलंबित
सर्वोच्च न्यायालयाने याच महिन्यात त्याची क्युरेटिव्ह पिटिशन रद्द केली होती. त्यानंतर त्याने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे दया याचिका दिली. पण, ती प्रलंबित आहे. त्यामुळे निकाल येण्याच्या आधीच आपल्याला फासावर लटकावले तर ते बेकायदेशीर ठरेल, असे त्याने याचिकेत म्हटले आहे.
याक़ूब केस : कधी काय झाले
-1993 च्‍या मुंबई सीरियल ब्लास्टमध्‍ये आरोपी
-2007 : टाडा कोर्टाने फासीची शिक्षा ठोठावली
-21 मार्च 2013 : फासीवर सुप्रीम कोर्टाची मोहर
-एप्रिल 2014 : राष्ट्रपतीने दया याचिका फेटाळली
-10 एप्रिल 2014 : सर्वोच्‍च न्‍यायालयात पुनर्विचार याचिका खारिज केली
-29 एप्रिल 2015 : टाडा कोर्टाने काढला डेथ वारंट
-30 जुलै हा फाशीची दिवस निर्धारित
-मे 2015 याक़ूबने दाखल केले क्यूरेटिव पिटीशन
-21 जुलै 2015: क्यूरेटिव पिटीशन फेटाळले
-23 जुलै 2015: सर्वोच्‍च न्‍यायालयात डेथ वारंटला आव्‍हान
-क्यूरेटिव पिटीशनवर निर्णयाच्‍या अगोदरच वारंट
-27 जुलैला याक़ूबच्‍या अर्जावर सुनावणी
-28 जुलैला सुप्रीम कोर्टात तीन सदस्‍यांचे न्‍यायपीठ स्‍थापन
-29 जुलैला स्‍वत: राष्‍ट्रपतीकडे केला दयेचा अर्ज