आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yakub Memon Must Not Hang We Brought Him Back Key Raw Officer

याकूबच्या फाशी विरोधात होते त्याला पकडून आणणारे \'रॉ\'चे अधिकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला पकडणारे 'रॉ'चे अधिकारी बी रमन त्याच्या फाशीच्या विरोधात होते. केंद्रीय सचिवालयात अतिरिक्त सचिव राहिलेलेले रॉचे अधिकारी बी रमन म्हणाले होते, की त्याला फाशी दिली जाऊ शकत नाही. त्यासोबतच त्यांनी स्पष्ट केले होते, की याकूबला नेपाळहून दिल्लीपर्यंत सरकारी फ्लाइटने आणण्यात आले होते. 2007 मध्ये एका इंग्रजी वेबसाइटकरीता त्यांनी लेख लिहिला होता. मात्र तो तेव्हा प्रकाशित झाला नव्हता. वेबसाइटने दावा केला आहे, की रमण यांचा लेख आता त्यांच्या भावाच्या परवानगीने प्रकाशित करण्यात येत आहे. 16 जून 2013 मध्ये रमन यांचे निधन झाले आहे. दुसरीकडे याकूबच्या फाशीवरुन धार्मिक राजकारण सुरु झाले आहे. ऑल इंडिया मजलित ए इत्तेहादूल मुसलिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी याकूब मुस्लिम असल्यामुळे त्याला फासावर लटवले जात असल्याचा आरोप केला.

भारताची रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) चे अधिकारी रमण यांना जेव्हा याकूब आणि त्याच्या कुटुंबींयासोबत संपर्क करण्यास सांगण्यात आले होते, तेव्हा ते पाकिस्तान डेस्क हेड होते.

काय लिहिले लेखात
रमण यांनी निवृत्तीच्या एक आठवडाआधी लिहिलेल्या लेखात म्हटले होते, जुलै 1994 मध्ये याकूबला काठमांडूमध्ये नेपाळ पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली होती. त्याला नेपाळमध्ये पकडून भारतीय हद्दीत आणण्यात आले आणि मग एव्हिएशन रिसर्च सेंटरच्या विमानाने दिल्लीत आणण्यात आले. नंतर त्याला जुन्या दिल्लीतून अटक करण्यात आल्याचे दाखवून चौकशीसाठी कस्टडीत घेण्यात आले होते. ही सर्व कार्यवाही त्यांच्या देखरेखीखाली झाल्याचाही त्यांनी दावा केला होता.
का होते फाशीच्या विरोधात
रमण यांनी लेखात म्हटले आहे, की शरण येण्याआधी याकूबने जे केले त्यासाठी त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे होती. पण अटक झाल्यानंतर त्याने तपास यंत्रणांना सर्व सहकार्य केले. त्याने तपास यंत्रणांना चौकशी आणि त्याच्या कुटुंबीयांबद्दल माहिती दिली त्यामुळे त्याला एवढी मोठी शिक्षा देण्याआधी थोडा विचार केला जाऊ शकतो. त्याच्या सहकार्यामुळेच साखळी बॉम्बस्फोटात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले.

ज्येष्ठ पत्रकार हुसैन झैदी यांनी दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्येही हाच मुद्दा मांडला आहे. याकूबमुळेच मुंबई स्फोटात पाकिस्तान सरकारचा हात असल्याचे उघड झाले, असल्याचे ते म्हणाले. पुर्ण मुलाखत वाचण्यासाठी (याकूबच्या जबाबामुळेच पाकिस्तानचा सहभाग उघड)येथे क्लिक करा.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हणाले ओवेसी