आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yakub Memons Comeback To India And Theories Behind It

टायगर याकूबला म्हणाला होता, गांधीवादी बनतोय पण दहशतवादी ठरशील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो सौजन्य : डीएनए - Divya Marathi
फोटो सौजन्य : डीएनए
नवी दिल्ली - मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा आरोपी याकूब मेमन भारतात कसा परतला होता, याबाबत अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. गुप्तचर संस्थेचे माजी अधिकारी बी. रमण यांच्या मते याकूबला सरेंडर करण्यासाठी राजी करण्यात आले होते. तर सीबीआयने याकूबची अटक ही जुन्या दिल्लीतील रेल्वे स्टेशनवर करण्यात आल्याचे दाखवले होते. आणखी एका माहितीनुसार इंटरपोलने त्याला भारतीय संस्थांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर त्याला सरकारी विमानात भारतात आणण्यात आले. पण याकूब भारतात का परतला होता, त्याने परतण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याचा भाऊ आणि दाऊदचा नीकटवर्तीय असलेल्या टायगरने त्याला काय म्हटले होते? याकूबच्या ब्रीफकेसमध्ये काय होते आणि त्याला पकडण्याच्या थेअरी (कथा) कोणकोणत्या? जाणून घ्या...

याकूबने भारतात परतण्याचा निर्णय घेतला तेव्हा काय म्हणाला होता टाइगर?
याकूबने 1994 ला एका वेबसाईट आणि वाहिनीला मुलाखत दिली होता. त्यात त्याने सांगितले होते की, त्याचा भाऊ आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा खास असलेला टाइगर मेमन त्याच्या भारतात परतण्याच्या विरोधात होता. टायगर याकूबला म्हणाला होता, ‘तू गांधीवादी बनून जातोय, पण त्याठिकाणी तुला दहशतवादी ठरवले जाईल.’ इंटरव्ह्यूमध्ये याकूबने सांगितले होते की, जेव्हा त्याचे कुटुंब कराचीला गेले तेव्हा विमानतळावर एक पाकिस्तानी एजंट आसिफने त्यांना रिसिव्ह केले. एजंटने याकूबचा इंडियन पासपार्ट घेतला आणि पाकिस्तानी पासपोर्ट दिला. कराचीमध्ये तौफिक जलियांवालाच्या घरी थांबण्यास सांगण्यात आले. याकूबला तौफीककडून समजले की, टायगर आणि त्याच्या चेल्यांना पाकिस्तानात ISI नेच मुंबईत बॉम्ब ठेवायची ट्रेनिंग दिली होती.

पहिली थेअरी - प्रॉपर्टीसाठी परतला होता याकूब?
1991 मध्ये याकूबने त्याला लहानपणीचा मित्र असलेल्या चेतन मेहताबरोबर मेहता अँड मेमन असोसिएट्स नावाने अकाऊंटींग फर्म सुरू केली होती. पुढे याच फर्ममध्ये गुलाम भोरिया तिसरा पार्टनर बनला. ते शिक्षणादरम्यानचे मित्र होते. पण ही फर्म वर्षभरच चालली. 1992 मध्ये ती बंद करण्यात आली. त्याच्या कारणांबाबत मात्र कधीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर याकूबने एआर अँड सन्स नावाने दुसरी फर्म तयार केली. एवढ्यावरच न थांबता त्याने एक्सपोर्टमध्येही काम सुरू केले. त्याने तिजारत इंटरनॅशनल नावाने एक्सपोर्ट फर्मही सुरू केली. ही आखाती देशांमध्ये मांस एक्सपोर्ट करायची. त्यात मिळालेल्या यशामुळे याकूबची आर्थिक स्थिती मजबूत बनली. त्यानंतर याकूबने मुंबईच्या माहीम परिसरातील अल-हुसेनी बिल्डिंगमध्ये 6 फ्लॅट खरेदी केले होते. या इमारतीत त्याचा भाऊ टाइगर मेमनचे दोन ड्युप्लेक्स बंगलो होते. याकूबला आर्थिक स्थिती डबघाईला जाऊ द्यायची नव्हती, त्यामुळे तो कराचीहून परतला असे सांगितले जाते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, याकूबला पकडल्याबाबतच्या काही थेअरी...