आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai Blast:डेथ वॉरंटला याकूब मेमनचे सुप्रीम कोर्टात आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा गुन्हेगार याकूब अब्दुल रज्जाक मेमनने ३० जुलैची फाशीची शिक्षा टाळण्यासाठी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

याकूबने मुंबईच्या विशेष टाडा कोर्टात डेथ वॉरंटला आव्हान दिले आहे. उचित प्रक्रियांचे पालन झाले नसल्याचे सांगत त्याने आपल्याला फाशी देणे बेकायदेशीर असल्याचा दावा त्याने केला आहे. मेमनच्या वकिलांनी सांगितले की, दिलाशाचे सर्व पर्याय संपण्याआधीच डेथ वॉरंट जारी करण्यात आले. हे नियमांच्या विरुद्ध आहे. पुनर्विलोकन याचिकेवर कोर्टाने निर्णय सुनावण्याआधीच डेथ वॉरंट जारी करण्यात आले होते.

नेमके सत्य काय?
मुंबई बॉम्बस्फाेटानंतर फरार झालेला याकूब मेमन भारतात का व कसा परतला ? बाॅम्बस्फाेटात त्याचा सहभाग काय हाेता? या प्रश्नांचा मागाेवा घेतला ज्येष्ठ पत्रकार हुसेन झैदी यांनी.