आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थव्यवस्थेचे वस्त्रहरण होत असताना मी शांत राहू शकत नाही, बोलणारच - यशवंत सिन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्थव्यवस्थेचे वस्त्रहरण होत असताना मी शांत बसणार नाही असे यशवंत सिन्हा म्हणाले. - Divya Marathi
अर्थव्यवस्थेचे वस्त्रहरण होत असताना मी शांत बसणार नाही असे यशवंत सिन्हा म्हणाले.
नवी दिल्ली - ढासळत्या अर्थव्यवस्थेवरुन विरोधकांसह स्वपक्षीयांनी केलेल्या हल्लाबोलला मोदींनी महाभारतातील उदाहरणाने उत्तर दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी यशवंत सिन्हा पुन्हा समोर आले आणि त्यांनीही महाभारतातीलच प्रसंग उद्धृत करुन अर्थव्यवस्थेचे वस्त्रहरण होत असताना मी शांत राहाणार नसल्याचे म्हटले आहे. 
 
भाजपमधील महाभारत 
देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवर काँग्रेस आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या हल्ल्यांना नरेंद्र मोदींनी गुरुवारी सायंकाळी कंपनी सचिवांच्या कार्यक्रमातून उत्तर दिले. त्यासाठी मोदींनी महाभारतातील उदाहरण दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा समोर आले आहेत. विशेष म्हणजे त्यांनीही महाभारतातील प्रसंगाचा उल्लेख केला. ते म्हणाले, अर्थव्यवस्थेचे वस्त्रहरण होत असताना मी शांत राहू शकत नाही. सिन्हा म्हणाले, 'मला वाटले होते, मोदी अर्थव्यव्सथेच्या सध्यस्थितीवरुन सरकारवर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी एखादा राज्यमंत्री पुढे करतील, परंतू ते स्वतः पुढे आले.' टीकाकारांना उत्तर देताना कोणाचेही नाव न घेता मोदी म्हणाले होते, 'काही लोक महाभारतातील कर्णाचे सारथ्य करणाऱ्यांसारखे असतात, हे लोक फक्त नैराश्य पसरवत असतात.'  
 
सिन्हा काय म्हणाले होत... 
- अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेले यशवंत सिन्हा यांनी एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात सरकारच्या आर्थिक धोरणांवर कडाडून हल्ला केला होता. ते म्हणाले होते, 'अर्थव्यवस्था ढासळलेली असताना त्यावेळी करण्यात आलेली नोटबंदी ही आगीत तेल ओतण्यासारखी होती.'
- सिन्हांनी आर्थिक आघाडीवर सरकार कोणकोणत्या बाबतीत अपयशी ठरत चालले आहे, हे विस्तृत आणि मुद्देसुद मांडले होते. ते म्हणाले होते, 'गेल्या दोन दशकांमध्ये खासगी क्षेत्रात गुंतवणूक कमी होत आली आहे. त्यातच जीएसटीला चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आले. यामुळे लाखो लोकांना बेरोजगार व्हावे लागले. अर्थव्यवस्था आधीच ढासळलेलली असताना नोटबंदी लागू केल्याने आगीत तेल ओतण्याचे काम केले.'
- 'नोटबंदी सर्वात मोठी आर्थिक आपत्ती ठरली. जीएसटी चुकीच्या वेळी लागू करण्यात आले. याचा एकत्रित विपरीत परिणाम उद्योगांवर झाला. लाखो लोक बेरोजगार झाले. मार्केटमध्ये रोजगारांची स्थिती नसल्याच जमा झाली.'
- याच लेखात सिन्हांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही वार केले होते. अर्थखात्याची जबाबदारी ही मोठी आहे. एक व्यक्ती 24 तास काम करत असला तरी या खात्याचे काम उरकले जाऊ शकत नाही. असे असताना जेटलींसारखा सुपरमॅनची ताकद असलेली व्यक्तीही येथे पूर्ण न्याय देऊ शकत नाही. 
- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर असताना त्यांनीही नोटबंदीमुळे लाखो लोकांचे रोजगार बुडाल्याचे सांगितले होते. 
 
मोदी काय म्हणाले... 
- देशात सुरू असलेल्या योजना व विकासाबाबतची सविस्तर आकडेवारी मांडताना मोदींनी अर्थव्यवस्थेत अनेक सकारात्मक गोष्टी सुरू असल्याचा दावा करून गुंतवणूक वाढ व आर्थिक विकासाला गती देण्यासाठी यापुढेही पावले उचलत राहू, असा निश्चय त्यांनी बोलून दाखवला. कंपनी सचिवांच्या सुवर्णमहोत्सवी समारंभात बोलताना पुढील तिमाहीत जीडीपीत ७.७% वृद्धी होईल, असे मोदी म्हणाले.

विरोधकांची टीका म्हणजे षडयंत्र असल्याचे सांगून आपली वाटचाल विरोधकांना सहन होत नसल्याची टीका मोदींनी केली. “वर्तमानाची चिंता करत देशाच्या भविष्याशी खेळता येणार नाही. मी रेवड्या उधळत नाही म्हणून माझ्यावर नेहमी टीका होते’, असे ते म्हणाले. नोटाबंदीबाबत टीकेला उत्तर देताना मोदी म्हणाले, ८ नोव्हेंबर हा दिवस इतिहासात भ्रष्टाचार मुक्तीच्या अभियानाचा प्रारंभ दिन म्हणून ओळखला जाईल. गरज पडल्यास जीएसटीमध्ये बदलाचे संकेत देत प्रामाणिकपणाला न्याय मिळेल, असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक आरोपाला मोदींचे उत्तर 
१. आरोप :नोटाबंदी आत्महत्या करण्यासारखेच... अर्थव्यवस्था ढासळलेली असताना नोटाबंदी लागू केल्याने आगीत तेल ओतल्यासारखे झाले.
मोदी
: आर्थिक आघाडीवरील टीका आम्ही चुकीची मानत नाही. नोटाबंदीचा निर्णय ही आमची हिम्मत होती. मागच्या सरकारमध्ये ६ वर्षांत ८ वेळा विकास दर ५.७ टक्के किंवा त्याहीपेक्षा अधिक घसरला होता. विकास दर १.५% , ०.२% पर्यंत खाली आला होता. एका तिमाहीत विकास दर घसरला तर या नकारात्मक मानसिकतेच्या लोकांना स्वप्नपूर्तीचा आनंद होण्यासारखे आहे.

२. आरोप : जीएसटीने अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला. रोजगार कमी झाला. गुंतवणूकही कमी होत आहे.
मोदी
:जूननंतर पॅसेंजर कारची विक्री १२%, व्यावसायिक वाहनांची २३%, ट्रॅक्टरची ३४% आणि दुचाकी वाहनांची विक्री १४% वाढली आहे. हवाई मार्गाने मालाची वाहतूक १६% आणि टेलिफाेन ग्राहक ४ टक्क्यांहून अधिक वाढले. गृह फायनान्स, नॉन बँकिंग फायनान्स, म्युच्युअल फंड, इन्शुरन्समध्ये गुंतवणूक वाढली आहे. कॅश टू जीडीपी प्रमाण १२% कमी होऊन ९%, महागाई १०% कमी होऊन सुमारे २.५% आणि चालू खाते तूट ४% कमी होऊन सरासरी १% आहे. विदेशी चलन ४० हजार कोटी डॉलरच्या वर आहे. दोन कोटी पीएफ खाती उघडली गेली. ही सर्व भक्कम अर्थव्यवस्थेची लक्षणे आहेत.

आरोप : नोटाबंदी आणि जीएसटीमुळे विकास वेडा झाला. मोदी सरकार चालवू शकत नसतील तर काँग्रेसला सत्ता सोपवावी.
मोदी
: महाभारतात दुर्योधन म्हणाला होता, धर्म पाळणे माझी प्रवृत्ती होऊ शकली नाही आणि अधर्म मी सोडू शकलो नाही. मूठभर लोक कर्णाचा सारथी शल्यासारखे नकारत्मकता पसरवत आहेत. डोकलाम वादावरही हेच लोक आम्हाला घेरत होते. त्यातून मार्ग काढलाच ना. या लोकांसाठीच सरकार पहिल्या दिवसापासून स्वच्छता अभियान चालवत आहे.

आरोप : काळा पैसा पांढरा झाला? अतिरेकी आजही घुसखोरी करताहेत.
मोदी
: पहिल्याच दिवशी काळा पैसा देशात यावा म्हणून एसआयटी स्थापन केली. इतर देशांशी करार केले. आज काळ्या पैशाचा व्यवहार करताना लोक आता पन्नास वेळा विचार करतात. आम्ही २.१० लाख बनावट कंपन्या बंद केल्या. २०२२ पर्यंत देशात एकही अशी कंपनी राहणार नाही.

आराेप : जीएसटीने देशाचे कंबरडे मोडले. व्यापार बसला.
मोदी
: जीएसटीला तीन महिने होत आहेत. जीएसटी परिषदेने व्यापाऱ्यांची अडचण होत असल्याचे व त्याचा आढावा घ्यावा, असे सांगितले आहे. प्रत्येक बदलाला सामोरे जाण्याची सरकारची तयारी आहे. या व्यापाऱ्यांचे जुने व्यवहार पाहिले जाणार नाहीत.
बातम्या आणखी आहेत...