आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Yashwant Sinha Tells Congress To Start 'Vadra School Of Management'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसने वढेरा स्कूल ऑफ मॅनेजमेंट उघडावे : यशवंत सिन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या हरियाणातील भूखंड खरेदी व्यवहारावरून मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात भाजप नेते यशवंत सिन्हा म्हणाले, ‘देशातील एका प्रतिष्ठित माणसाने नफा कमावण्याचे अस्सल उदाहरण दिले आहे. यात गुंतवणुकीचीही गरज नाही.’ सभागृहाबाहेर पडल्यावर त्यांनी थेट वढेरा यांचे नाव घेतले. ‘काँग्रेसने वढेरा स्कूल ऑफ मॅनेजमेंट उघडावे आणि त्यात अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना प्रवेश दिला पाहिजे. यामुळे देशाचा तोटा तरी कमी होईल,’ असे सिन्हा म्हणाले. दुपारी गोंधळामुळे लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर कामकाज होऊ शकले नाही. सिन्हा आणि भाजपचेच निशिकांत दुबे यांनी वढेरा मुद्दय़ावर चर्चेची नोटीस दिली होती.

हा मुद्दा येताच काँग्रेसचे संजय निरुपम आणि इतर काही सदस्य सभापतींसमोर मोकळ्या जागेत आले आणि एकच गोंधळ सुरू झाला. शेवटी कामकाज तहकूब करण्यात आले.

दरम्यान, वढेरा यांच्याविरुद्ध अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर बुधवारी सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे. डॉ. नूतन ठाकूर यांनी ही याचिका दाखल केलेली आहे.