आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Yasin Bhatkal Admits To Have Carried Out Blast In Delhi, Mumbai And Bengaluru

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भटकळची एनआयएच्‍या कोठडीत रवानगी, कोलकात्‍यात स्‍फोटाने खळबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- इंडियन मुजाहिदीनचा संस्‍थापक आणि मास्‍टर माईंड दहशतवादी यासिन भटकळने देशात अनेक ठिकाणी बॉम्‍बस्‍फोट घडविल्‍याचे न्‍यायालयात मान्‍य केल्‍याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भटकळला एनआयएच्‍या पथकाने दिल्‍लीत नेले. त्‍याच्‍यासोबत अटक करण्‍यात आलेल्‍या दोन साथीदारांनाही एनआयएने ताब्‍यात घेतले आहे. सर्वांना पतियाळा न्‍यायालयात हजर करण्‍यात आले. तिघांनाही 12 दिवसांपर्यंत एनआयएची कोठडी देण्‍यात आली आहे. दरम्‍यान, कोलकात्‍यातील चांदनी चौक भागात एका गावठी बॉम्‍बचा स्‍फोट झाल्‍यानंतर दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. पोलिसांनी एक बॉम्‍ब निकामीही केला.

भटकळने दिल्‍ली, पुणे आणि बंगळुरु येथील स्‍फोटांमध्‍ये हात असल्‍याचे मान्‍य केले आहे. यासिनने गुन्‍हा तर कबुल केला, परंतु त्‍याला कोणत्‍याही कृत्‍याचा पश्‍चाताप नाही. बॉम्‍बस्फोट घडवून त्‍याला दहशतीचे वातावरण तयार करायचे होते. इंडियन मुजाहिदीनचे मुख्‍यालय कराचीमध्‍येच असल्‍याचेही त्‍याने सांगितले. यासिन भटकळ 2009मध्‍ये पाकिस्‍तानात होता आणि आयएसआयच्‍या अनेक बड्या अधिका-यांना तो भेटला हाता, असे राष्‍ट्रीय तपास संस्‍थेच्‍या (एनआयए) सुत्रांनी सागितले.

वाचा हिजबुल मुजाहिदीनच्‍या 5 दहशतवाद्यांना जवानांकडून कंठस्‍नान