आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यासीन भटकळ सुरतमध्‍ये करणार होता छोट्या अणुबॉम्‍बचा स्‍फोट, पाकिस्‍तानकडूनही मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- गुजरातमधील सुरत शहरात छोट्या अणूबॉम्‍बचा स्‍फोट घडविण्‍याचा भीषण कट इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने आखला होता. इंडियन मुजाहिदीनच्‍या संस्‍थापकांपैकी एक असलेल्‍या यासीन भटकळने याबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. त्‍याच्‍या अटकेमुळे हा कट फसला. अणुबॉम्‍बचा स्‍फोट करण्‍याची योजना पाकिस्‍तानचीच होती, अशीही कबुली त्‍याने दिली आहे. या माहितीनंतर भारतीय तपास यंत्रणांची झोप उडाली आहे.

यासीन भटकळला नेपाळच्‍या सीमेवरुन दोन महिन्‍यांपूर्वी अटक करण्‍यात आली होती. त्‍याने चौकशीदरम्‍यान सांगितले, की सुरत शहरात अणुबॉम्‍बचा स्‍फोट घडविण्‍याचा कट होता. पाकिस्‍तानात बसलेल्‍या सुत्रधारांच्‍या इशा-यावर हा कट तडीस नेण्‍यात येणार होता. परंतु, अटक झाल्‍यामुळे सुरत बचावले.

पाकिस्‍तानातील अण्‍वस्‍त्रे सुरक्षित नाहीत. दहशतवादी त्‍यांचा वापर करु शकतात, हा संशय खरा ठरला आहे. भारत आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी याबाबत चिंता व्‍यक्त केली आहे.