आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्‍लास्‍ट होतच असतात- निर्विकार भटकळचे उत्तर, माध्‍यमांना दिली धमकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- इंडियन मुजाहिदीनचा मास्‍टरमाईंड यासिन भटकळला अटक केल्‍यामुळे देशातील अनेक बॉम्‍बस्‍फोटांसदर्भात महत्त्वाची माहिती मिळणार आहे. तपास यंत्रणांचे हे मोठे यश आहे. भटकळला मोतीहारी न्‍यायालयात गुरुवारी हजर करण्‍यात आले होते. शेकडो निष्‍पाप भारतीयांचे प्राण घेणारा भटकळ न्‍यायालयात निर्विकार होता. एवढेच नव्‍हे तर त्‍याने प्रसारमाध्‍यमांकडे बोट दाखवून परिणाम भोगण्‍यास तयार राहा, अशी धमकीही दिली. भटकळचा देशभरात दिवाळीपूर्वी 17 ठिकाणी बॉम्‍बस्‍फोट घडविण्‍याचा कट होता. राजधानी दिल्‍लीत रॉकटेने हल्‍ला करण्‍याची योजना त्‍याने आखली होती. भटकळसह दोन जणांनाही अटक करण्‍यात आली होती. त्‍यांना दिल्‍लीत आणून एनआयएच्‍या ताब्‍या देण्‍यात येणार आहे.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, न्‍यायालयात यासिन भटकळ निर्विकार होता. न्‍यायालयात विचारलेल्‍या प्रश्‍नांचीही त्‍याने उडवाउडवीची उत्तरे दिली. बॉम्‍बस्‍फोट होतच असतात, त्‍यात नवे काय आहे, असे तो एका प्रश्‍नाच्‍या उत्तरात बोलला. हे उत्तर ऐकून स्‍वतः न्‍यायाधीशही चकीत झाले. न्‍यायालयातून बाहेर पडताना भटकळने प्रसारमाध्‍यमांकडे बोट दाखवून काही तरी सांगण्‍याचा प्रयत्‍न केला. बोटांनी इशारा करताना त्‍याने माध्‍यमांना परिणाम भोगण्‍यास तयार राहण्‍याची धमकी दिली. पोलिसांच्‍या मते हा इशारा देऊन त्‍याने त्‍याच्‍या साथीदारांना संदेश देण्‍याचाही प्रयत्‍न केला असावा. याचीही चौकशी करण्‍यात येणार आहे.

दगडुशेठ हलवाई गणपतीची केली होती भटकळने रेकी... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये..

आणखी वाचा...

दहशतवादी टुंडाला खायचीये जामा मशिद परिसरातील मोगलाई बिर्याणी
न्यायालयाच्या आवारात देशद्रोही अब्दुल करीम टुंडाला चोपले
देशासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती, मनमोहनसिंग यांची संसदेत कबूली
मालेगाव स्फोटप्रकरणी राष्‍ट्रीय तपास यंत्रणेने नऊ जणांना दिली क्लीन चिट
गोष्‍ट भटक(ळ)लेला यासि‍नची