आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yasin Bhatkal\'s Aide Assaulted By Jail Inmate Inside Tihar Jail

दहशतवादी यासीन भटकळच्या सहकार्‍यावर तिहार तुरुंगात जिवघेणा हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक यासीन भटकळचा सहकारी फसीह मोहंमद याच्यावर तिहार तुरुंगात अन्य कैद्यांनी हल्ला केला. तिहार जेलचे प्रवक्ता सुनील गुप्ता यांनी सांगितले की, बराक क्रमांक दोनमध्ये ठेवण्यात आलेले आरोपी सिमरन व फसीह मोहंमद यांच्यात किरकोळ कारणांनी वाद झाला. त्यातून सिमरनने फसीहवर हल्ला करून त्याला जखमी केले. फसीह मोहंमद याला दहशतवादी कारवायांप्रकरणी 2012 मध्ये सौदी अरेबियात अटक करण्यात आली होती. अवैध शस्त्रास्त्र कारखाना चालवल्याप्रकरणी त्याच्यावर खटला सुरू आहे.

फसीह मोहंमद याला जखमी अवस्थेत व्हीलचेअरवर दिल्लीच्या एका न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याने व त्याच्या वकिलांनी घटनेची महिती सत्र न्यायाधीशांना दिली. त्यावर न्या. दया प्रकाश यांनी तिहार तुरुंग प्रशासनाकडे हल्ल्याबाबत विस्तृत अहवाल देण्याचे आदेश देत फसीह मोहंमदवर एम्समध्ये उपचार करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. त्यानंतर त्याला डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्यानंतर त्याला स्वतंत्र बराकीत ठेवून सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याचे तुरुंग अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.