आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yeddyurappa Offers Unconditional Merger With BJP

येडियुरप्पा नरेंद्र मोदींना शरण, म्हणाले कर्नाटक जनता पक्ष भाजपमध्ये विलीन करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपमधील बंडखोर नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी त्यांचा कर्नाटक जनता पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची तयारी दर्शविली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी 28 खासदार कर्नाटकमधून निवडून देण्याचे आश्वासन येडियुरप्पा यांनी दिले आहे.
येडियुरप्पा यांचा प्रस्ताव भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आणण्यात आणि गेल्या निवडणुकीत भाजपला पराभवाचे धक्के देण्यात येडियुरप्पा यांनी मोलाची भूमिका बजावलेली होती. त्यामुळे त्यांच्या प्रस्तावावर कोणता निर्णय घ्यावा, यावर भाजपमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
यापूर्वी येडियुरप्पा यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामिल होण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, आता त्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला असून नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य केले आहे.
येडियुरप्पा भाजपमध्ये येणार, वाचा पुढील स्लाईडवर