आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग गुरू रामदेव, श्री श्री रविशंकर यांनी नाकारला ‘पद्म’ पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारने प्रदान करण्याआधीच योगगुरू रामदेव बाबा यांनी पद्म सन्मान नाकारला आहे. याशिवाय श्री श्री रविशंकर यांनीही हा सन्मान नाकारला आहे. प्रजासत्ताकदिनी अडवाणी, रामदेव यांच्यासह १०० वर मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करण्यात येणार असल्याची चर्चा होती.

गृहमंत्री राजनाथसिंह यांना पाठवलेल्या पत्रात रामदेव म्हणाले की, पद्मविभूषण हा सन्मान आपल्याला देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती माध्यमांद्वारे कळली आहे. मात्र आपण एक संन्यासी आहोत. संन्याशासाठी तिरस्कार व सन्मान या दोन्ही अवस्थ समान आहेत. यामुळे मी कृतज्ञता व विनम्रतेने सांगू इच्छितो की हा सन्मान एखादे गौरवपूर्ण कार्य करणा-या मान्यवराला दिला जावा.