आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: रामदेव-लालूंचा हास्ययोग, गालावर क्रीम लावत केली कॉमेंट, आधी म्हटले होते \'डिरेल बाबा\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - योग गुरु बाबा रामदेव सध्या त्यांच्या पतंजलिच्या उत्पादनांची भरपूर जाहिरात करताना दिसत आहेत. त्याच अनुषंगाने त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते लालू यादव यांची भेट घेतली. लालूंच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या भेटीत रामदेव यांनी सुरुवातील त्यांना योग करुन दाखवला. मीडियासमोर त्यांनी पतंजलिच्या उत्पादनांचे कौतूक करत लालूंच्या गालांवर क्रीम लावून दाखवले. रामदेव म्हणाले, लालू केवळ आमच्या योगाचेच नाही तर उत्पादनांचेही ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. योगगुरुंना कधी 'डिरेल बाबा' म्हणणारे लालू यादव यांनीही त्यांची यावेळी स्तुती केली.

लालू यादव म्हणाले, बाबांच्या यशाने अनेकांच्या पोटात दुखते
- रामदेव आणि लालू माध्यमांसमोर आल्यानंतर लालू यादव यांनी बाबांनी शिकवलेल्या योगाचे प्रात्यक्षिक करुन दाखवले.
- ते म्हणाले, 'बाबांनी प्रथम माझ्याकडून मेडिटेशन करुन घेतले. भ्रामरी केल्याने माझा मेंदू स्वच्छ झाला आहे. अनुलोम-विलोम देखील केले. त्याने मला चांगले वाटत आहे.'
- लालू यादव म्हणाले, 'बाबा विदेशी कंपन्यांपेक्षा चांगले उत्पादन घेऊन आले आहेत. यामुळे लोकांच्या पोटात दुखायला लागले आहे.'
- 'भांडवलदारांच्या साबणीमध्ये सोडा जास्त असतो, तर बाबांच्या साबणमध्ये दुध आहे. आम्ही दुध पिणारे आहोत त्यामुळे त्वचा चांगली राहाते.'
- बाजारात अनेक गडबड घोटाळ्याचे कॉस्मेटिक उत्पादने आहेत. आता मी बाबांचा पर्मनंट ब्रँड अॅम्बेसेडर आहे.
- रामदेव बाबांमुळे अनेकांचे दुकान बंद झाले आहे. आता सर्व त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहात आहेत. त्यांच्या विरोधात एखादे षडयंत्र होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
- रामदेव यांनी पंतजलिचे अॅनर्जी चॉकलेटही लालूंना दिले.

पुढील स्लाईडवर वाचा... रामदेव म्हणाले, लालू आमचे ब्रँड अॅम्बेसेडर... आहेत एकमेकांचे कट्टर विरोधक... लालू म्हणाले होते ठग....बघा दोघांचा व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...