आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगदिनानिमित्त उद्या 35 हजार फुट उंचीवर स्पाईसजेटच्या विमानात होणार योगा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पाईसजेटमध्ये योगा करताना कर्मचारी व प्रवाशी - Divya Marathi
स्पाईसजेटमध्ये योगा करताना कर्मचारी व प्रवाशी
नवी दिल्ली- दिल्लीतील राजपथवर 21 जूनला साजरा केला जाणा-या इंटरनॅशनल योगा डेची तयारी सुरु आहे. दुसरीकडे, स्पाईसजेट एयरलाईन्स कंपनीने विमानात योगा सेशन ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पाईसजेट कंपनी आपल्या विमानात 35000 फुट उंचीवर प्रवाशांसोबत योगा करणार आहे. कंपनीने या सेशनचे नाव 'हाय ऑन योगा अॅट 35000 फुट' असे ठेवले आहे. याचे ट्रायल रनसुद्धा सुरु झाला आहे.
दिल्ली ते गुवाहाटी या प्रवासादरम्यान स्पाईसजेटच्या विमानात शुक्रवारी प्रवाशांकडून योग करून घेतला. दरम्यान, पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी दिलेल्या धमकीनंतर आयोजित केलेला योगा डे चा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. पाकिस्तानात श्री श्री रविशंकर यांच्या संस्थेने काही ठिकाणी योगा सेशन आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता.
21 जूनला विमानात योगा-
कंपनीच्या माहितीनुसार, योगा सेशन रविवारी 21 जून, 2015 रोजी काही निवडक उड्डाण केलेल्या विमानात केला जाईल. कंपनीचे अध्यक्ष अजय सिंह यांनी सांगितले की, ''आमच्या स्पाईसजेटच्या उडत्या विमानात योगा करण्याचा पराक्रम करणार असल्याने आम्हाला आनंद झाला आहे. जगात प्रथमच असे घडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योगाच्या योजनेमुळे उत्साहित आहोत. चालक दल आणि ईशा फाउंडेशनच्या संचालक उड्डाणादरम्यान 'उपा योग'चे प्रदर्शन करतील.
फ्लाईटमध्ये सीटवर बसून योगा करणार प्रवासी-
कंपनीच्या म्हणण्यानुसार, फ्लाईटमधील प्रवाशी बसल्या बसल्या आपल्या सीटवर योगा करतील. कंपनी यासाठी प्रवाशांना प्रोत्साहन देणार आहे. हे सेशन सुमारे 10 मिनिटे होईल. याशिवाय शेकडो स्वयंसेवक विमानतळावर स्पाईसजेटच्या चेक-इन काऊंटर आणि बोर्डिंग गेटजवळ नमस्कार मुद्रेत प्रदर्शन करतील.
पुढे पाहा, प्रवाशांनी केला विमानात योगा...
बातम्या आणखी आहेत...