आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yoga To Get Sports Status Will Create Millions Of Jobs

योगाला मिळणार खेळाचा दर्जा, लाखो प्रशिक्षकांना मिळू शकतो रोजगार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - योगाला खेळ म्हणून मान्यता देण्याचा विचार करवा असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग म्हणजेच डीओपीटीने क्रीडा मंत्रालयाला दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात कबड्डीप्रमाणे योगाचाही राष्ट्रीय खेळांमध्ये समावेश केला जाण्याची दाट शक्यता आहे. तसे जाले तर शेकडो वर्ष जुन्या असलेल्या या कलेच्या जोरावर लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

21 जूनला राजपथावर 45 हजार जण करणार योग
21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींसह सुमारे 45 हजार लोग दिल्लीच्या राजपथावर योगाभ्यास करणार आहेत. संयुक्त राष्ट्राने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस घोषित केला आहे. डीओपीटीच्या निर्देशानुसारच योगा फेडरेशनला क्रीडा मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे. भविष्यकाळात विविध वयोगटातील स्पर्धकांच्या योग स्पर्धाही आयोजित केल्या जाऊ शकतात. इंटर स्टेट, झोनल आणि राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये योगचा समावेश केला जाऊ शकतो.1990च्या बीजिंग आशियाई खेळांमध्ये कबड्डीचा समावेश करण्यात आला होता. तर आता जागतिक स्तरावर याला मान्यता मिळू लागली आहे. योगालाही खेळाचा दर्जा मिळाला तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याला हा सन्मान मिळेल अशी शक्यता आहे. योगाचा समावेश बऱ्याच शाळा आणि विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातही करण्यात आला आहे.

आयुष विभागही सक्रिय
डीओपीटीच्या निर्देशानंतर आयुष आणि क्रीडा मंत्रालय वेगाने वाटचाल करत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार क्रीडा मंत्रालय योगाची खेळ म्हणून घोषणा करण्यासाठी केवळ आयुष मंत्रालयाच्या हिरव्या झेंडीची वाट पाहत आहे. तज्ज्ञांच्या मते, योगाला खेळाचा दर्जा मिळाला तर त्यामुळे देशभरात लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. देशभरात योगाच्या प्रशिक्षकांसाठी रोजगाराचा नवा मार्ग उपलब्ध होऊ शकेल. 21 जूनला जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटीही सहभागी होणार आहेत. देशभरातील सुमारे 11 लाख एनसीसी कॅडेट्स आणि लष्कराचे पाच हजार जवानही योग कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

योगी आदित्यनाथ यांचे वादग्रस्त वक्तव्य
दरम्यान गोरखपूरचे भाजप खासदार आदित्यनाथ यांनी योगाच्या मुद्यावरून एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. योग-सूर्य नमस्कार याचा विरोध करणाऱ्यांनी समुद्रात जीव द्यावा असे ते म्हणाले आहेत. तसेच त्यांनी भारताबाहेर जावे असेही आदित्यनाथ म्हणाले आहेत.