आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yoga To Get Sports Status Will Create Millions Of Jobs

क्रीडा स्पर्धांत होणार योगाचा समावेश, मोदींचे क्रीडा मंत्रालयाला निर्देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त झाल्यानंतर आता हा योग आश्रमातून मैदानावर पोहोचला आहे. योग हा एक क्रीडा प्रकार आहे काय, यावर सरकारने आयुष मंत्रालयाचा सल्ला मागवला आहे. यावर सकारात्मक उत्तर आले तर आगामी काळात योग राष्ट्रीयसह इतर क्रीडा स्पर्धेत समाविष्ट होऊ शकतो. योगाला क्रीडा प्रकार जाहीर करणे हे योग्य पाऊल असल्याचे क्रीडा मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. यामुळे खेळाडूंचे आरोग्य सुधारेल आणि लाखो लोकांना यातून रोजगारही उपलब्ध होईल.

ऑस्ट्रेलिया-दुबईतही तयारी : आंतरराष्ट्रीय याेग दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात भारतीय वकिलातीच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या विविध भागांत आतापासूनच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून २१ जून रोजी मुख्य कार्यक्रम होईल. दरम्यान, दुबईतही योग दिनाची जय्यत तयारी सुरू असून सर्व उद्यानांत पहाटेपासून योगसाधकांसाठी माेफत प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे.
योग, ताई ची आणि आर्ट ऑफ लिव्हिंगसारख्या कार्यक्रमांना या उद्यानांत मोफत प्रवेश दिला जातो.

बंधनकारक नाही
आंतरराष्ट्रीय योगदिनी कार्यक्रमांना उपस्थित राहणे बंधनकारक नाही, असे आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. २१ जूनला कार्यक्रमासाठी भारतात १५२ देशांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले अाहे.