आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगेंद्र यादव यांच्‍यासह 96 जणांना अटक; कपडे फाडून मारहाणही केली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगेंद्र यादव आणि कार्यकर्त्‍यांना पार्लियामेंट स्ट्रीट पोलिस घेऊन जाताना. - Divya Marathi
योगेंद्र यादव आणि कार्यकर्त्‍यांना पार्लियामेंट स्ट्रीट पोलिस घेऊन जाताना.


नवी दिल्ली - नवीन भूमी अधिग्रहण कायद्याच्‍या विरोधात आम आदमी पक्षाचे माजी नेते योगेंद्र यादव यांनी 'स्‍वराज्‍य अभियाना'अंतर्गत सोमवारी कार्यकर्त्‍यांसह जंतरमतर मैदानावर रॅलीचे आयोजन केले होते. दरम्‍यान, सोमवारी रात्री पोलिसांनी यादव यांच्‍यासह 96 कार्यकर्त्‍यांना ताब्‍यात घेतले असून, पोलिसांनी कपडे फाडून मारहाण केल्‍याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

यादव आणि त्‍यांचे कार्यकर्त्‍यांनी सोमवारी रात्री पंतप्रधान यांच्‍या निवासस्‍थानाकडे रॅली काढण्‍याचा प्रयत्‍न केला. पण, पोलिसांनी त्‍यांना ताब्‍यात घेतले. पोलिसांनी सांगितले, सूर्यमावळच्‍या आतच रॅली काढण्‍याची परवानगी होती. त्‍यामुळे सायंकाळी आंदोलकांनी परत जाण्‍याचे सांगितले. पण, त्‍यांनी ऐकले नाही. उलट पंतप्रधानाच्‍या निवासस्‍थानाकडे रॅली नेण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यामुळे कलम 144 नुसार त्‍यांना ताब्‍यात घेण्‍यात आले. दरम्‍यान, यादव यांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. ते म्‍हणाले, पोलिसांनी त्‍यांचे कपडे फाडले आणि मारपीटही केली, असा आरोप त्‍यांनी केला आहे. तर, त्‍यांचे सहकारी विकासकुमार झा यांनी सांगितले, आम्‍ही संवैधानिक मार्गानेच आंदोलन करत होतो. पण, पोलिसांनी आम्‍हाला अडवले आणि दुरव्‍यवहार केला. आम्‍हाला जबरदस्‍ती उचलून त्‍यांच्‍या गाड्यात बसवले. आणि पार्लियामेंट स्ट्रीट पोलिस ठाण्‍यात नेले गेले. त्‍या ठिकाणी प्रशांत भूषण पोलिस ठाण्‍याच्‍या बाहेर होते. त्‍यांना योगेंद्र यांना भेटू दिले नाही.
यादव यांनी केले ट्वीट
योगेंद्र यादव यांनीही ट्वीट करून पोलिसांवर आरोप केला. ते म्‍हणाले, आमचे फोन हिसकावून घेतले गेले आमच्‍या सोबत दुरव्‍यवहार केला गेला. आमच्‍या ज्‍या ठिकाणी उभे तिथे आमचा कुणालाच त्रास नव्‍हता. तरीही आमच्‍यावर अन्‍याय केला गेला.