आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल खोटारडे, तोमरच्या बनावट डिग्रीची त्यांना होती माहिती -योगेंद्र यादव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे माजी कायदा मंत्री जितेंद्र तोमर यांच्या बनावट डिग्री प्रकरणी योगेंद्र यादव यांनी दिल्लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्‍य केले आहे. केजरीवाल यांना तोमर याच्या कायद्याच्या बनावट डिग्रीविषयी पूर्वीपासूनच माहिती होती, असा आरोप यादव यांनी आज केला.
फेब्रुवारीमध्‍ये डिग्रीबाबत केजरीवालांना पूर्व कल्पना दिल्याचा दावा योगेंद्र यादव यांनी केला आहे. केजरीवाल यांना तोमर यांनी चुकीची कागदपत्र दाखवली, असे आम आदमी पक्षाने स्पष्‍टीकरण दिले होते.

तोमर आणि 25 आमदारांविषयी माहिती दिली
केजरीवाल यांना तोमरप्रकरणी दगाफटका दिला गेल्याचे सांगितले जाते, तेव्हा मला आश्‍चर्य वाटले, असे योगेंद्र यादव म्हणतात. मात्र सत्य माहीत असूनही तोमर यांच्याविरध्‍द त्यांनी चौकशीचे आदेश दिले नाहीत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही 25 उमेदवारांची अशीच माहिती दिली होती, असे यादव यांनी सांगितले.

पोलिस कोठडीत तोमर
तोमर पोलिस कोठडीत आहेत. 22जून रोजी न्यायालयाने जामीनाचा अर्ज गंभीर गुन्हा म्हणून फेटाळला आहे. न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडी 6 जूनपर्यंत वाढवली आहे. तोमर यांनी दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनात भाग घेण्‍यासाठी जामीन मागितला होता. त्यांना 9 जून रोजी बनावटी डिग्रीप्रकरणी अटक केली गेली होती. त्यांच्याविरुध्‍द भारतीय दंड संहितेच्या 420,467, 468 आणि 120 बी(गुन्हेगारी षंडयंत्र) नुसार गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.