आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आप\' झाली खाप, शांती भूषण म्हणाले - बंडखोर मी देखील होतो, मला का नाही काढले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे नेते शांती भूषण यांनी 'आप' आता खाप झाल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, बंडखोर तर मी देखील होतो मग मला का काढले नाही. आपने सोमवारी रात्री बंडखोर नेते योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, प्रो. आनंद कुमार आणि अजित झा यांची हकालपट्टी केली. या चौघांवर पक्षविरोधी कारवायी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. अजित झा यांना सोडून इतर तिघांनी सोमवार पर्यंत या नोटीशीला उत्तर दिले होते. त्यानंतर सोमवारी रात्री पक्षाने चौघांना पक्षातून काढण्याचा निर्णय घेतला.
पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर योगेंद्र यादव म्हणाले, मला माझ्या घरातून ओढत बाहेर काढले असे वाटत आहे. तसेच ते म्हणाले, की पक्ष असाच निर्णय घेणार याची मला कल्पना होती. पक्षातून काढणे ही एका नव्या आणि लांबच्या सुखद प्रवासाची सुरुवात आहे.
लोकांच्या स्वप्नांसोबत खेळ - प्रो. आनंद कुमार
आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्या आणि स्वराज अभियानाचे राष्ट्रीय संयोजक प्रो. आनंद कुमार म्हणाले, जनतेने आपच्या माध्यमातून स्वराजचे स्वप्न पाहिले होते. माझ्यासाठी ही दुःखद वार्ता आहे. स्वतः अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकऱ्यांसाठी हा चांगला दिवस नाही. आम्ही स्वराजसाठी आपसोबत जोडले गेलो होतो. आम्ही आमचे स्वप्न जिवंत ठेवणार. देशातील लाखो लोकांनी हे स्वप्न पाहिले होते. आमच्या हकालपट्टीचा निर्णय आम्हाला भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी लोकांविरोधात स्वराज संवाद आणि लोक-राजनीतीच्या दिशेने काम करण्यासाठी अधिक जबाबदारीने वागण्यासाठी अधिक सक्रिय करेल. प्रो. आनंद म्हणाले, की सत्तेसमोर गुढघे टेकवण्यास नकार देणाऱ्या शेवटच्या फळीतील निःस्वार्थी सामाजिक कार्यकर्त्यांना कोण थांबवू शकणार आहे आणि त्यांना कोण हरवणार ?
(फाइल फोटो - शांती भूषण. )