आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yogendra Yadav, Prashant Bhushan Expelled From Aam Aadmi Party

योगेंद्र यादवसह चौघांची आपमधून हकालपट्टी, समितीच नियमबाह्य - भूषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे बंडखोर नेते प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान भूषण यांनी चौकशी समितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ज्यांनी आरोप केले तेच लोक चौकशी समितीत असल्यामुळे ती समितीच मान्य नसल्याचे भूषण यांनी म्हटले आहे.

प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी कारणे दाखवा नोटिसीचा खुलासा दिला नाही. शिवाय त्यांनी शिस्तभंगाची चौकशी करणाऱ्या समितीवरच आक्षेप घेतला आहे. अशी समिती नेमणे बेकायदेशीर असल्याचा त्यांनी आरोप केला. दोन समिती सदस्यांवर आरोप करून त्यांना हटवण्याची मागणी भूषण यांनी केली आहे.

आपने 17 एप्रिल रोजी पार्टी विरोधी कारवायांचा आरोप भूषण यांच्यासह अन्य चार नेत्यांवर केला होता. त्यांनी रविवारपर्यंत स्पष्टीकरण देणे अपेक्षित होते. मात्र, नियोजित वेळेत कोणीही खुलासा दिला नाही. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रीय अनुशासन समितीचे गठन कोणी, का कधी केले मला माहीत नाही तसेच या समितीवरून पंकज गुप्ता आशिष खेतान यांनीच आपल्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे त्यांना हटवण्यात यावे, अशी मागणी भूषण यांनी केली आहे.