आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मोदींना मिळणार सुषमा \'माता\' आणि \'बुजुर्ग\' अडवाणींचा आशीर्वाद\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षातर्फे (भाजप) पंतप्रधानपदासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच योग्य उमेदवार असल्याचे सांगून योगगुरू रामदेव बाबांनी गुरुवारी त्यांची वकिली केली आहे. रामदेव यांनी सांगितले की, भाजपेचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे पक्षाचे बुजुर्गअसून त्यांचा मोदींना नक्कीच आशीर्वाद मिळेल. एवढेच नाही तर सुषमा स्वराज ह्या मोदींना मातेसमान असून त्यांचाही कृपाशीर्वाद मोदींच्या पाठीशी राहणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे तोंडेसुख घेणार्‍या नरेंद्र मोदींना केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी टार्गेट केले. सिब्बल सांगितले की, ते मोदीसोबत चर्चा करायला तयार आहे. मोदी ज्या गोष्टीचे भांडवल करत आहेत ते, त्यांना गुजरातच्या जनतेने दिले असल्याचाही टोला सिब्बल यांनी लगावला आहे.