नवी दिल्ली - पर्यटनासाठी विदेशात जाण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण त्यासाठी लागणा-या खर्चाचा विचार केला तर स्वप्न स्वप्नच राहते. पण निराश होण्याचे कारण नाही भारत राहूनही
आपण विदेशातील पर्यटनाचा आनंद घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला जास्त पैसेही खर्च करावे लागणार नाही. होय! दिल्लीपासून 2400 किलोमीटर असलेल्या पुडूचेरीमध्ये हे शक्य आहे.
येथे फ्रान्समध्ये फिरल्यासारखे वाटते....
- पुडुचेरी भारतातील सुंदर शहरांपैकी एक आहे.
- येथे आपल्याला पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय फिरता येईल.
- असे म्हटले जाते की, येथे फिरल्यानंतर फ्रान्समध्ये फिरल्यासारखे वाटते.
- पुडुचेरी हे अत्यंत शांत आणि सुंदर ठिकाण आहे.
- हे शहर समुद्राच्या किना-यावर वसले आहे.
- उत्कृष्ठ नगररचनेतून हे शहर वसवण्यात आले आहे.
- फ्रेंच लोकांसाठी येथे व्हाइट टाउन नावाची कॉलनी आहे.
येथे कसे पोहोचावे....
- येथे जाण्यासाठी चेन्नईपासून 135 किलोमीटर अंतरावर पुडुचेरीचे विमानतळ आहे.
- या शहराच्या पूर्ण कानाकोप-यात फ्रेंच संस्कृती आणि कलेचे दर्शन घडते.
- काही महापुरूषांचे पुतळेही या शहरात आपल्याला पाहायला मिळतील.
- येथील प्रॉमिनाड बीचवर राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा आहे.
- त्यामुळे प्रॉमिनाड बीचला गांधी बीच या नावाने ओळखले जाते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पुडुचेरीच्या निसर्गाचे मनमोहक फोटो....