आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजांनी विकला होता ताजमहल, भारतीय व्‍यापाऱ्याने केली खरेदी, वाचा Facts...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा- जगप्रसिद्ध ताज महिलाच्या मुख्य घुमटाला मातीचा मुलामा देण्यात येणार आहे. वर्षभर घुमटाभोवती स्टिलचे स्ट्रक्चर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांची मोठी निराशा होणार आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे जगातील सात आश्‍चर्यामध्‍ये समाविष्‍ट असलेल्‍या ताजमहलाबाबतच्‍या तुम्‍ही कधी न ऐकलेली, वाचलेली रंजक माहिती...
लढाऊ विमानांपासून वाचण्‍यासाठी ताज महलाला झाकले होते
दुसऱ्या महायुद्धाच्‍या काळात ब्रिटनच्‍या शत्रूराष्‍ट्रांकडून ताजमहलाला धोका होता. त्‍यामुळे लढाऊ विमानांना ही ऐतिहासिक वास्‍तू दिसू नये, यासाठी ब्रिटेनने अमेरिकन सैन्‍याच्‍या मदतीने ताज महलला बांस आणि लाकडाच्‍या साहाय्याने पूर्णपणे झाकले होते. यातून जापान आणि जर्मनीच्‍या लढाऊ विमानांच्‍या डोळ्यात धूळफेक करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला होता. या संबंधीचे छायाचित्र आजही भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण (एएसआय)च्‍या आग्रा सर्कल ऑफिसमधील लायब्ररीमध्‍ये आहे.
मिळाली होती गुप्‍त माहिती
जपान आणि जर्मनीकडून ताज महलावर हल्‍ला केला जाणार आहे, अशी गुप्‍त माहिती मित्र देश अमेरिका आणि ब्रिटेन यांना मिळाली होती. नंतर तत्‍काळ ताज महलाला झाकण्‍यात आले.

1971 मध्‍ये हिरव्‍या कापडाने झाकला
भारताला स्‍वातंत्र मिळाल्‍यानंतर भारत-पाकिस्‍तान युद्धाच्‍या काळात वर्ष 1971 मध्‍ये ताज महलपासून 10 किमी अंतरार पाक सैनिकांनी बॉम्‍ब वर्षाव केला होता. त्‍यामुळे ताजमहलाला हिरव्‍या कपड्याने झाकले होते. पाकिस्‍तानी विमानांना ताज महलाऐवजी हिरवळ दिसावी, या मागचा उद्देश होता. पण, त्‍याचे छायाचित्र उपलब्‍ध नाही.
पुढील स्लाइड्सवर वाचा, इंग्रजांनी सात लाख रुपयांना विकला होता ताजमहल....
शाहजहांने नव्‍हता बांधला डायना बेंच... शाहजहांने नव्‍हता बांधला डायना बेंच.... होता 466 किलो सोन्‍याचा कळस....इंग्रज नवदाम्‍पत्‍य साजरे करत होते पहिली रात्र....