आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • You Have Ex Minister Thats Why Governmnet Provides Security You

माजी मंत्री आहात म्हणून शासनाने सुरक्षा पुरवावी; सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एका माजी मंत्र्याला उत्तर प्रदेशात पोलिसांकडून मिळत असलेल्या सरकारी सुरक्षेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने आश्‍चर्य व्यक्त केले आहे. तुम्ही एक माजी मंत्री आहात म्हणून तुम्हाला वाय सुरक्षा मिळाली पाहिजे का? आम्हाला याविषयी काही समजायल मार्गच नाही, असा प्रश्‍न खंडपीठाचे न्यायाधीश ग्यान सुधा मिश्रा आणि मदन बी. लोकूर यांनी माजी मंत्री असलेल्या रामवीर उपाध्‍याय यांना विचारला. उपाध्‍याय हे मायावती शासनामध्‍ये मंत्री होते.अखिलेश यादव यांचे सरकार आल्याने त्यांची सुरक्षाव्यवस्था काढून घेण्‍यात आली.याविरूध्‍द उपाध्‍याय यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.खंडपीठाने त्यांना अहलाबाद उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्‍यास सांगितले आहे. यादव यांचे सरकार आल्यावर उपाध्‍याय यांची वाय सुरक्षाव्यवस्था काढण्‍यात आली व त्यांना शस्त्रधारी पोलिस शिपाई देण्‍यात आला होता.


मंत्र्यांचे वक‍ील यु.यु. ललित यांनी न्यायालयाला सांगितले की माझ्या पक्षकारावर सहा वेळा हल्ला करण्‍यात आला. त्यामुळे त्यांना पोलिस संरक्षणाची गरज आहे. सरकार बदलल्यामुळे सुरक्षा काढण्‍यात आली, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. खंडपीठाने सांगितले ,की निर्णय देण्‍यापूर्वी राज्य सरकारची बाजू ऐकूण घेणार आहे. पुढील सुनावणी 5 जूनला होणार आहे.