आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटनाचा अनोखा विक्रम, लिफ्ट मागून केला बल्गेरिया-भारत प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बल्गेरियात राहणाऱ्या एका प्रेमीयुगुलाने एक अनोखा विक्रम स्वत:च्या नावावर नोंदवला असून भविष्यात तो मोडला जाण्याची शक्यता तशी दुर्मिळच दिसत आहे. बोरिस कानेव्ह व मारता सामलिया अशी या जोडप्याची नावे असून त्यांनी बल्गेरियापासून भारतापर्यंतचा प्रवास दुसऱ्या वाहनचालकांना लिफ्ट मागून पूर्ण केला आहे, हे विशेष!

एका इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार या प्रेमी युगुलाने एके दिवशी भारतात फिरायला येण्याचा निर्धार केला. यात्रेचे वेगळेपण जपण्यासाठी त्यांनी असेही ठरवले की हा संपूर्ण प्रवास अन्य वाहनचालकांना लिफ्ट मागून पूर्ण करायचा. बोरिस- मारता यांनी प्रवासात स्मार्टफोनदेखील सोबत घेतला नाही. केवळ पर्यटनस्थळे, निसर्ग सौंदर्य टिपण्यासाठी कॅमेरा, नोटबुक, ई बुक्स, प्रवासासाठी लागणारे इतर आवश्यक साहित्य सोबत घेऊन हे जोडपे बाहेर पडले. त्यांनी त्यांचा प्रवास बल्गेरियापासून सुरू केला.

आठवणी ब्लॉगवर
बोरिस कानेव्ह व मारता यांनी त्यांचा प्रवास पूर्ण करताना आलेल्या आठवणी व अनुभव त्यांचे मित्र, कुटुंबीयांसमवेत शेअर करत राहिले. त्यांच्याकडील जुन्या फोनच्या साह्याने ते त्यांच्या संपर्कात होते. प्रवास काळात ते नियमित ब्लॉग लिहित होते. हा प्रवास खूप रोमांचक राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हजारो किमीचा प्रवास ११५ दिवसांत पूर्ण केला
यानंतर ते दोघे म्यानमारमार्गे भारतात दाखल झाले. भारतासह संपूर्ण आशियाई देशांचा प्रवास त्यांनी ११५ दिवसांत पूर्ण केला. भारतात त्यांनी दिल्लीसह इतर काही शहरांना भेटी दिल्या.
बातम्या आणखी आहेत...