आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोबाइल, कपड्यांवर तरुणाईचा खर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील तरुणाईमध्ये सौंदर्य प्रसाधनांविषयीची आवड वाढत असून बँड्रेड कपडे, क्रीम व नव्या मोबाइलवर युवक मुक्तहस्ते खर्च करत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. या सर्वांवर युवक सरासरी सहा हजार रुपये मासिक खर्च करतात.

वाणिज्य व उद्योग मंडळ असोचेमने केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जागतिक युवा दिनाच्या पूर्वसंध्येला जारी करण्यात आले. देशभरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 16 ते 21 वयोगटातील 2000 युवकांसोबत चर्चा करण्यात आली. युवक दिन दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. असोचेमचे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार 2003 मध्ये युवक कडे, क्रीम व पावडरवर 1500 महिना खर्च करत होते. तोच खर्च आता सहा हजारांवर जाऊन पोहोचला आहे.

दिल्लीतील युवक आघाडीवर
राजधानी दिल्लीसह मुंबई, कोलकाता, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, चंदिगड आदी शहरांत सर्वेक्षण करण्यात आले.यात क्रीम, पावडर व इतर सौंदर्य प्रसाधने, मोबाइल फोन खरेदीसंदर्भात त्यांचा कल जाणून घेण्यात आला. त्यांनी सांगितले की कपडे, मोबाइल, सौंदर्य प्रसाधनांवर सरासरी मसिक खर्च सहा हजार रुपये होतो. दिल्लीतील तरुणाई त्यात आघाडीवर आहे.

महागाईमुळे नैराश्य
वाढती महागाई, हिंसाचार तसेच आर्थिक व सामाजिक समस्यांमुळे नागरिकांमध्ये नैराश्य, मानसिक समस्या वेगाने वाढत आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारतात नैराश्यग्रस्त रुग्णांची संख्या जास्त असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. भारतात सध्या 36 टक्के लोक मेजर डिप्रेसिव्ह एपिसोडचे शिकार असल्याचे अहवालात म्हटले आहे.