आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांच्या डोक्यात वाहू लागले देशप्रेमाचे वारे, असाही व्हॅलेंटाइन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तरुण-तरुणींनी अनेक योजना आखल्या असतील. मात्र, काही तरुण असेही आहेत की, ज्यांच्या अंगात देशप्रेमाचे वारे संचारले आहे. तरुणवयात आपल्या भारतमातेसाठी प्राणाचे बलिदान करण्यास मागेपुढे पाहिले नाही, अशा शहिद भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आजाद या हुतात्म्यांची चित्रे विशिष्ट हेअरकटद्वारे डोक्यावर काढली आहेत. 
 
अशा प्रकारचा ट्रेंड राजधानी दिल्लीत पसरलेला दिसून येतो. याची सुरुवात दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी सुभाष, राजस्थानातील राेहित मल्होत्रा आणि झारखंडच्या महेंद्र प्रामाणिक आदींनी केली. महेंद्र हेअर ड्रेसर असून तो केसावर अशा प्रकारच्या आकर्षक चित्रे तयार करतो.

दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी सुभाष आणि रोहित हे दोघे “आजादी के सच्चे सिपाही’ या नावाने स्थापन झालेल्या  क्लबशी संबंधित इतर विद्यार्थ्यांसोबत हिरिरिने सहभाग नोंदवत आहेत.
सुभाष म्हणाला: आजच्या तरुण पिढीला स्वातंत्र्यलढ्यातील शहिदांचा विसर पडला आहे. आमचा व्हॅलेंटाइन डे ला विरोध नाही. परंतु देशप्रेम व्यक्त करण्यासाठी, त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागृती मोहिम चालू आहे. हेअरकटच्या बाबतीत म्हणाल तर, मेट्रो, मॉल्स यासारख्या ठिकाणी क्लबचे सदस्य जेव्हा वेगळ्या लूकमध्ये दिसून येतात तो लोकांचे लक्ष आपोआप इतिहासातील पानाकडे वळते. 
 
अशी सुचली कल्पना 
दोन्ही विद्यार्थ्यांनी सांगितले, आमचा एक मित्र महेंद्रकडे एका बॉलीवूडच्या कलाकाराचे चित्र डोक्यावर काढून घेण्यासाठी गेला होता. या दरम्यान आम्ही एक वेगळी कल्पना शोधून काढत हाेतो. महेंद्रला भेटलो तेव्हा आम्हाला नवा मार्ग सापडला आणि देशप्रेमाचे वारे तर अंगात संचारले होतेच. महेंद्रने गांधी जयंतीला हेअर स्टाइलद्वारे महात्मा गांधी यांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली होती.

चित्र काढण्यास एका वेळी लागतात ४ तास
धनबाद नगदा येथील राहणाऱ्या हेअर ड्रेसर महेंद्र याने सांगितले: या महिन्यात १०० हून अधिक तरुणांनी स्वातंत्र्यलढ्यातील अनेक हुतात्म्यांची छायाचित्रे काढली आहेत. एक आकृती तयार करण्यास ४ ते ५ तास लागतात. तसे पाहता ही कारिगरी वेळ आणि पैशाबाबतीत खूप खर्चिक आहे. पण देशप्रेम व्यक्त करण्यासाठी महेंद्र अशा अाकृती तयार करण्यासाठी कोणताही खर्च घेत नाहीत.
बातम्या आणखी आहेत...