आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AAP चा युवा चेहरा अलका लांबा, NSUI च्या होत्या अध्यक्ष, कांग्रेसमध्येही केले काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आपच्या नेत्या अलका लांबा यांची एकेकाळी काँग्रेसमध्ये एवढी चलती होती, की मोठे मोठे नेते त्यांच्या कार्यालयात हजेरी लावत होते. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या गुड बुकमध्ये अलका लांबा यांचे नाव सर्वात आधी येत होते. केसरी यांनीच त्यांनी NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष बनवले होते.

दिल्लीचे राजकारण बऱ्याच अंशी (DU) दिल्ली विद्यापीठाच्या आसपास फिरते. यावेळी निवडणुकीत असे अनेक उमेदवार आहेत जे पूर्वी दिल्ली विद्यापीठात अध्यक्ष राहिलेले आहेत. चांदनी चौक मतदारसंघातील "आप'च्या उमेदवार अलका लांबा याही दिल्ली विद्यापीठाच्या अध्यक्ष होत्या. त्या दिल्ली निवडणुकांतील "आप'चा तरुण चेहरा आहे.

39 वर्षीय अलका यांनी 1994 मध्ये विद्यार्थी नेत्याच्या रुपात राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी नॅशनल स्टूडंट यूनियन ऑफ इंडिया (NSUI) मध्ये दिल्ली स्टेट गर्ल कनव्हेनरची जबाबदारीही स्वीकारली होती.

एका वर्षानंतर त्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभ्या राहिल्या आणि पहिल्याच प्रयत्नात मोठा विजयही मिळवला. 1997 मध्ये त्यांना ऑल इंडिया NSUI चे अध्यक्ष बनवण्यात आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाची पदे सांभाळली. काँग्रेसकडून त्यांनी निवडणूकही लढवली. पण भाजपच्या मदन लाल खुरानाकडून त्यांचा पराभव झाला. 2013 मध्ये अलका लांबा यांनी काँग्रेस सोडून "आप' (आम आदमी पार्टी) मध्ये प्रवेश केला होता.

वादांशी नाते
अलका खासगी आयुष्यात अत्यंत स्टायलीश आहेत. त्यांना स्टाइलीश नेत्या म्हणून ओळखले जाते. एकिकडे चांगल्या वक्त्या म्हणून त्यांची ओळख असताना अनेक वादातही त्यांची नावे आहेत. गुवाहाटी येथील पीडितेची ओळख सार्वजनिक करणे, पतीपासून विभक्त होणे हे त्यापैकी काही वाद आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासून अलका यांना लाईम लाइटमध्ये राहणे पसंत होते. 20 वर्षे पक्षात राहून तिकिट मिळाले नाही, त्यामुळे अलका यांनी पक्ष सोडला होता.
अलका लांबा यांचे राजकीय जीवन
>2002, मध्ये मुख्य राजकारणात प्रवेश केला आणि अखिल भारतीय महिला कांग्रेसच्या जनरल सेक्रेटरी बनल्या.
>2003, मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर भाजपच्या मदन लाल खुराना यांच्या विरोधात पराभव झाला.
>2006 मध्ये त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमेटीचे सदस्य बनवण्यात आले.
>2013 मध्ये अलका लांबा यांनी काँग्रेस सोडत "आप' मध्ये प्रवेश केला.
पुढील स्लाइड्वर पाहा, अलका लांबा यांचे PHOTO