आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FOCUS : लठ्ठ पगारापेक्षा करिअरला तरुणांची पसंती, टाइम्स जॉब्जचे सर्वेक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नवी नोकरी शोधताना आता गलेलठ्ठ पगारापेक्षा कंपनी कशी आहे, आपल्या करिअरला त्यात कितपत वाव आहे याला नवतरुण आता जास्त प्राधान्य देत आहेत. नोकरी निवडताना संबंधित कंपनीचा सखोल अभ्यास करण्याकडे कल असल्याचा निष्कर्ष टाइम्स जॉब्जच्या सर्वेक्षणातून समोर आला.

या सर्वेक्षणानुसार, कंपनी निवडण्यापूर्वी ती दीर्घकालीन करिअरसाठी योग्य आहे की नाही याला ४६ टक्के नोकरीइच्छुक तरुण प्राधान्य देतात, तर ३८ टक्के तरुणांनी संबंधित नोकरीसाठी अर्ज करताना त्या कंपनीचा सखोल अभ्यास करतो, असे मत नोंदवले. यासंदर्भात टाइम्स जॉब्जचे सीओओ विवेक मधुकर यांनी सांगितले, आता हे नोकरीइच्छुक कंपन्यांकडे फार वेगळ्या पद्धतीने पाहतात, असे सर्वेक्षणावेळी आढळून आले.

सर्वेक्षणानुसार, नवतरुण मंडळी जेथे नोकरीसाठी अर्ज करायचा आहे, त्या कंपनीची सखोल माहिती काढतात. त्या कंपनीच्या समीक्षात्मक लेखांचे वाचन करतात, त्यांना मुलाखतीत विचारण्यात येणाऱ्या संभाव्य प्रश्नांची तयारी करतात. त्यासाठी संबंधित क्षेत्रातील अचूक माहिती ते जाणून घेतात. त्या क्षेत्रातील सर्वोत्तम वेतन काय, आपल्याकडील कौशल्ये कोणती याबाबतही ते माहिती घेतात.

शोध विविध साधनांतून
नोकरीचा शोध घेण्यासाठी हे इच्छुक विविध माध्यमांचा वापर करतात. यासाठी इंटरनेट, सोशल मीडिया, कंपनी रेटिंग प्लॅटफॉर्म आदींचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
बातम्या आणखी आहेत...