आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरविंद केजरीवाल यांच्‍या जनता दरबारात तरुणाने कापले स्‍वतःचे मनगट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍लीचे भावी मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्‍या जनता दरबारामध्‍ये एका तरुणाने मनगटाची नस कापल्‍याचा खळबळजनक प्रकार घडला. केजरीवाल यांच्‍यासाठी काहीही करण्‍यास तयार असल्‍याचे सांगण्‍याचा या तरुणाचा प्रयत्‍न होता. त्‍याला तत्‍काळ रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले.

कौशम्‍बी येथे 'आप'च्‍या मुख्‍यालयासमोर केजरीवाल यांचा जनता दरबार भरतो. आज (शुक्रवार) सलग तिस-या दिवशी जनता दरबार भरला. त्‍यात झमील अहमद नावाचा तरुण सहभागी झाला होता. दिल्‍लीतील झोपडपट्ट्यांबाबत तो तक्रार घेऊन गेला होता. त्‍याने अचानक ब्‍लेड काढली आणि मनगटावर वार केले. त्‍यामुळे एकच खळबळ उडाली. केजरीवाल यांना तो म्‍हणाला, 'तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा, असे सुभाषचंद्र बोस म्‍हणाले होते. मी तुमच्‍यासोबत असून तुमच्‍यासाठी काहीही करण्‍यास तयार आहे.'

दिल्‍ली विद्यापीठातील भ्रष्‍टाचाराची जनता दरबारात तक्रार.... वाचा पुढे...

(फोटोः अरविंद केजरीवाल यांच्‍या जनता दरबारातील एक दृ ष्‍य. )