आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोषी आढळल्यास भारतींना होऊ शकते 7 वर्षांची शिक्षा, मंत्रीपदावरून हकालपट्टी?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दक्षिण दिल्लीतील कथित सेक्स रॅकेटवर छापेमारी केल्याप्रकरणी केजरीवाल सरकारमधील कायदामंत्री सोमनाथ भारती यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. भारतींच्या विरोधात याप्रकरणी आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर भारती यात दोषी आढळले तर त्यांना सात वर्षांची शिक्षा होऊ शकते.
दुसरीकडे, भारती यांच्या कथित छापेमारी प्रकरणी जनतेचा व माध्यमांचा दबाव वाढत असल्याने केजरीवाल यांचीही बोलती बंद झाली आहे. भारती यांना मंत्रिमंडळातून हटविण्याबाबत दबाव वाढला आहे. त्यामुळे केजरीवाल आज उपराज्यपाल नजीब जंग यांची भेट घेणार आहेत. केजरीवालांशिवाय काँग्रेसचे नेतेही उपराज्यपालांची भेट घेणार असून, कायदामंत्री भारती यांना बडतर्फ करण्याची मागणी करणार आहेत. दिल्ली महिला आयोगही भारती यांना महिलांचा छळ केल्याप्रकरणी नोटिस बजावणार आहे.
याआधी, युगांडातील महिलांनी प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांच्यासमोर धक्कादायक जबाब दिला आहे. युगांडाच्या एका महिलेने म्हटले, की मी मंत्री भारती यांना ओळखले आहे. टीव्हीवर त्यांना दाखविण्यात आल्यानंतर त्यांची ओळख पटली. त्या रात्री ते आले होते. त्याच्यासोबत अनेक लोक होते. त्यांच्या हातात काठ्या होत्या. त्यांनी आम्हाला मारहाण केली. विनयभंग केला. देश सोडून चालते व्हा, अन्यथा एक-एकाला मारून टाकू, अशी धमकीही दिली, असा जबाब या महिलेने नोंदवला आहे. 15 जानेवारी रोजी ते आले होते. त्यानंतर मी त्यांना टीव्हीवर पाहिले म्हणून भारती यांना ओळखू शकले, असा दावा तिने केला आहे. त्याआधी दिल्ली पोलिसांनी मंगळवारी रात्री पाच आफ्रिकन महिलांचा जबाब नोंदवला. यामध्ये तीन नायजेरियन व दोघी युगांडाच्या महिला आहेत. विनयभंग, वर्णद्वेषी ताशेरे, घराची झाडाझडती आणि मारहाण प्रकरणी कलम 164 नुसार न्यायाधीशासमोर या पाचही जणांचा जबाब नोंदवण्यात आला.
पुढे वाचा, काय आहे भारती प्रकरण...