आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत यमुना धोक्याच्या पातळीवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हरियाणातील हथिनीकुंड धरणाच्या विसर्गामुळे यमुना नदीची पाणी पातळी वाढली आहे. दिल्लीत ही नदी धोक्याच्या पातळीपेक्षा दोन मीटर वरून वाहत आहे. पाणी पातळी 206.96 मीटरवर पोहोचली आहे. यामुळे सखल भागांत पाणी तुंबले आहे. धरणातून सोमवारी 9 लाख क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. दरम्यान, हळूहळू हे पाणी ओसरण्यात सुरुवात झाली आहे. परंतु, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे लोकांनी आपल्या घरांच्या छतावर आसरा घेतला आहे. अनेक ठिकाणी ट्रक, बस पाण्यात बुडाल्या आहेत.