आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Yuva Desh Congress Online Magazine Tweets Derogatory Meme On PM Modi Deletes Later.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसच्या ऑनलाईन मॅगझिनमध्ये मोदींबद्दल वादग्रस्त ट्विट; डिलीट करायची नामुष्की

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसने ऑनलाईन मॅगझिन युवा देशमध्ये मोदीचे पोस्ट केलेले ट्विट. - Divya Marathi
काँग्रेसने ऑनलाईन मॅगझिन युवा देशमध्ये मोदीचे पोस्ट केलेले ट्विट.

नवी दिल्ली- गुजरात निवडणुकीआधी भाजप आणि काँग्रेसमधल्या टीकेने खालची पातळी गाठली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेले वादग्रस्त ट्विट मागे घ्यायची वेळ काँग्रेसचे ऑनलाईन मॅगझिन 'युवा देश'वर आली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यासोबतचा एक फोटो युवा देशने ट्विट केला होता. 'आप लोगोंने देखा विपक्ष मेरे कैसे कैसे मेमे बनवाता है?' असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले होते. 'उसे मेमे नही मेम कहते है' असे कॅप्शन ट्रम्प यांच्या फोटोला देण्यात आले. त्यानंतर 'तू चाय बेच' असे कॅप्शन थेरेसा मे यांच्या फोटोला देण्यात आले.

 

मोदींबद्दलचे हे वादग्रस्त ट्विट अंगाशी आल्यावर युवा देशने हे ट्विट डिलीट केले. पण भाजप नेत्यांनी यावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे हे ट्विट गरीब विरोधी आहे, यावरून काँग्रेसची गरिबांबाबतची भूमिका कळते, अशी टीका गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केली आहे.

 

या ट्विटबद्दल सगळीकडून टीका सुरु झाल्यावर काँग्रेस मात्र बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळते आहे. अशा प्रकारच्या विनोदबुद्धीचे आम्ही समर्थन करत नाही. आमच्या धोरणांमध्ये आणि मतांमध्ये फरक असला तरी काँग्रेस पंतप्रधान आणि सगळ्या विरोधकांचा आदर करते, असे ट्विट काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केले आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...