आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींना निमंत्रण देण्यासाठी युवी पोहोचला संसदेत, ५ दिवसानंतर अॅक्ट्रेससोबत होणार विवाह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - क्रिकेटर युवराजसिंहचा विवाह येत्या ३० नोव्हेंबरला चंदिगडमध्ये होणार आहे. त्याचे निमंत्रण नरेंद्र मोदींना देण्यासाठी तो आज संसदेत आला होता. यावेळी त्याची आई शबनम या देखिल सोबत होत्या. बॉलिवूड अॅक्ट्रेस हेजल कीच त्याची जीवन संगिनी होणार आहे. १३ डिसेंबर रोजी युवी ३४ वर्षांचा होत आहे.
- युवी आणि हेजल यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका हटके आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचे फोटो सोशल मीडियावर आले होते.
- सोनेरी रंगाचे हे कार्ड क्रिकेट थीमवर तयार करण्यात आले आहे. सँडी आणि कपिल खुरान यांनी ते डिझाइन केले आहे.
- निमंत्रण पत्रिकेवर टायटल आहे 'युवराज आणि हेजल प्रीमियर लीग'.
- सँडी आणि कपिलने एका मुलाखतीत सांगितले होते, की युवीने त्यांना फनी थीमवर कार्ड डिझाइन करण्याचे सुचविले होते. त्याला कार्डमध्ये भरपूर कार्टून्स पाहिजे होते.
युवीच्या लग्नात केव्हा, काय होणार
- ३० नोव्हेंबर - चंदीगडमध्ये शीख परंपरेनुसार गुरुद्वाऱ्यात लग्न होईल.
- २ डिसेंबर - गोव्यात हिंदू पद्धतीने विवाह संपन्न होईल.
- ५ डिसेंबर - दिल्लीत एका फार्म हाऊसवर संगीत प्रोग्राम.
- ७ डिसेंबर - दिल्लीतील सिटी हॉटेलमध्ये रिसेप्श्न होणार आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कशी आहे युवीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका आणि त्याची होणारी पत्नी
बातम्या आणखी आहेत...